Homeताज्या बातम्यामनोरंजन

सिंघम अगेन’च्या शूटिंगदरम्यान अजय देवगण जखमी

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटाची सध्य

अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्राविरोधात खटला दाखल
अजय देवगणला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार प्रदान
अजय देवगणसोबत लिफ्ट न वापरता करतो पायऱ्यांचाच वापर

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण त्याच्या आगामी ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटाची सध्या शूटिंग सुरू आहे. चित्रपटाच्या सेटवरून अजय देवगणसोबत इतर कलाकारांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हे पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढत चालली आहे. मुंबईमध्ये सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. अशातच शूटिंगदरम्यान अजय देवगण पुन्हा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अजय देवगण जखमी झाल्यामुळे या चित्रपटाचे शूटिंग रद्द करण्यात आलेमिळालेल्या माहितीनुसार, अजय देवगण ‘सिंघम 3’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. शूटिंग सुरू अशताना सेटवर अजय देवगणच्या डोळ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घेत आहे. एका सूत्राने झूम दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘अजय देवगण जखमी झाल्यामुळे ‘सिंघम 3’ ची शूटिंग सध्यातरी रद्द करण्यात आली आहे.अजय देवगण जखमी झाल्यामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. पण आता शक्य आहे की शूटिंग सुरू होईल. आता या चित्रपटाची टीम हैदराबादमध्ये शूटिंग करेल. कारण चित्रपटाच्या शूटिंगच्या तारखा आधीच निश्चित केल्या गेल्या आहेत. मुंबईमध्ये डिसेंबर २०२३ मध्ये रद्दा करण्यात आलेले चित्रपटाचे शूटिंग आता हैदराबादमधील शूटिंग पूर्ण झाल्यानंतर पुन्हा केले जाईल

COMMENTS