Homeताज्या बातम्यादेश

एअर मार्शल अमर प्रीत सिंग हवाई दलाचे नवे प्रमुख

नवी दिल्ली ः सरकारने हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून सध्या कार्यरत असलेले एअर मार्शल अमर प्रीत सिंग, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, यांची 30 सप्टेंबर 2024 पास

श्रीगोंद्यातील कोथूळ शिवारात तरुणाची हत्या
पंंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात आढळले भुयार
जगातलं सर्वात मोठ्ठं विमान.. जणू व्हेल मासाचं

नवी दिल्ली ः सरकारने हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून सध्या कार्यरत असलेले एअर मार्शल अमर प्रीत सिंग, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, यांची 30 सप्टेंबर 2024 पासून, एअर चीफ मार्शल पदावर, पुढील हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सध्याचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएम, एडीसी हे 30 सप्टेंबर 2024 रोजी राजीनामा देऊन पदमुक्त होत आहेत.
27 ऑक्टोबर 1964 रोजी जन्मलेले एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांना डिसेंबर 1984 मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ वैमानिक शाखेत नियुक्त करण्यात आले होते. सुमारे 40 वर्षांच्या प्रदीर्घ आणि प्रतिष्ठित सेवेत त्यांनी कमांड, स्टाफ, निर्देशात्मक आणि परदेशी नियुक्ती अशा विविध पदांवर काम केले आहे. नॅशनल डिफेन्स अकादमी, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी असलेले हे एअर ऑफिसर योग्यता असलेले फ्लाइंग इंस्ट्रक्टर आणि एक प्रायोगिक टेस्ट पायलट असून त्यांना विविध प्रकारच्या फिक्स्ड आणि रोटरी विंग विमानाच्या 5,000 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ऑपरेशनल फायटर स्क्वॉड्रन आणि फ्रंटलाइन एअर बेसचे नेतृत्व केले आहे. टेस्ट पायलट म्हणून, त्यांनी रशियामध्ये मॉस्को येथे चळॠ-29 अपग्रेड प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीमचे नेतृत्व केले. नॅशनल फ्लाइट टेस्ट सेंटरमध्ये ते प्रोजेक्ट डायरेक्टर (फ्लाइट टेस्ट) देखील होते आणि त्यांना लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजसच्या फ्लाइट टेस्टिंगची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी साउथ वेस्टर्न एअर कमांडमध्ये एअर डिफेन्स कमांडर आणि इस्टर्न एअर कमांडमध्ये वरिष्ठ एअर स्टाफ ऑफिसर या महत्त्वाच्या कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. हवाई दलाच्या उपप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते सेंट्रल एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ होते.

COMMENTS