Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

25 लाख हेक्टरवर सेंद्रीय शेती करण्याचे उद्दिष्ट- मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना व उपक्रम आखून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात सेंद्रिय शेतीचे प्रमाण

अमूल कंपनीने पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ केली
वर्ध्यात चणा खरेदीला सुरवात
ऐन दिवाळीत ऊसदरासाठी रस्त्यावर उतरू; शेतकरी संघटनांचा इशारा

मुंबई : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना व उपक्रम आखून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न केले जात असून 25 लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी केले.

कोल्हापुरातील कणेरी मठ येथे 20 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत चालणार्‍या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व काडसिद्धेश्‍वर स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. समारंभास शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भय्याजी जोशी, खासदार सर्वश्री धनंजय महाडिक, धैर्यशील माने, संजय मंडलिक, कर्नाटकचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार सर्वश्री प्रकाश आवाडे, प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील- यड्रावकर, महेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. त्यामुळे भविष्यात सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. गट शेती, क्लस्टर बरोबरच नैसर्गिक शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी शासनामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. भारत हा कृषिप्रधान देश आहे. नदीला, मातीला माय मानणारी आपली संस्कृती असून या संस्कृतीचे जतन आणि रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण व संस्कृती रक्षणाची चळवळ पुन्हा जोमाने सुरु होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

COMMENTS