अहमदनगर मनपा पोटनिवडणुक : भाजपचे प्रदीप परदेशी यांचा विजय

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर मनपा पोटनिवडणुक : भाजपचे प्रदीप परदेशी यांचा विजय

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असून अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या या पोटनिवडण

नगरचा पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत ; दुरुस्ती कामासाठी सहा तास उपसा बंद
मोबाईल टॉवरची अंतिम सुनावणी होईपर्यंत प्रेक्षपण राहणार बंद
अहमदनगरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त ; एकाला अटक

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असून अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी ५१७ मतांनी विजयी झाले आहेत.शिवसेना-राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार सुरेश तिवारी यांचा त्यांनी दारुण पराभव केला.
भाजप मधून हकालपट्टी झालेल्या वादग्रस्त माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याची निवड रद्द करण्यात आल्या नंतर रिक्त जागेवर ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती.बुधवारी सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर मनसेचे पोपट पाथरे पहिल्यापासून आघा डी वर होते,मात्र त्यांची आघाडी पाचव्या फेरीनंतर तुटली.मतमोजणीच्या अखेरीस शिवसेना,राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे सुरेश तिवारी यांना २५८९ भाजपचे परदेशी यांना ३१०६ तर मनसेचे पोपट पाथरे यांना १७५१ मते पडली.मनपा पोटनिवडणुकी चा हा निकाल महापालिकेतील सत्ताधारी महाविकास आघाडी व विशेषत: शिवसेनेला मोठा धक्का देणारा आहे.

COMMENTS