Ahmednagar : वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्जत तालुक्यातील डॉक्टरांचा सन्मान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Ahmednagar : वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्जत तालुक्यातील डॉक्टरांचा सन्मान

वैद्यकीय क्षेत्रात मागील पंचवीस वर्षापासून अधिक काळ मानव सेवेची सेवा देणाऱ्या कर्जत तालुक्यातील डॉक्टरांचा तसेच कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न

अहमदनगर मध्ये एसटी चालकाची गळफास घेऊनआत्महत्या (Video)
महानगरपालिकेच्या कार्यालयात भरवले खड्ड्यांचे प्रदर्शन…
शेकडो युवक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

वैद्यकीय क्षेत्रात मागील पंचवीस वर्षापासून अधिक काळ मानव सेवेची सेवा देणाऱ्या कर्जत तालुक्यातील डॉक्टरांचा तसेच कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक रुग्णांचे प्राण वाचवणार्‍या डॉक्टर्स व हॉस्पिटल मधील सर्व कर्मचाऱ्यांचा अहमदनगर शहरातील न्यूक्लिअस  हॉस्पिटलच्या वतीने सन्मान करण्यात आला.आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नुकताच हा छोटेखानी सत्कार कार्यक्रम पार पडला. 

या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी न्यूक्लिअस हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर गोपाळ बहुरुपी ,डॉक्टर सुधीर बोरकर ,डॉक्टर चेतना बहुरुपी यांच्यासह कर्जत तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेश तोडमल ,कर्जत शहर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर भंडारी, मिरजगाव मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर पंढरीनाथ गोरे यांच्यासह कर्जत तालुक्यातील डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आयोजित कार्यक्रमाप्रसंगी कोरोना काळात सेवा देताना मृत्युमुखी पडलेले डॉक्टर व हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.  कोरोना काळात डॉक्टरांनी दिलेल्या सेवेच्या कार्याचे कौतुक करत आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या .  तर आयोजित या सत्कार समारंभ कार्यक्रमा संदर्भात बोलताना कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर गोपाळ बहरुपी यांनी अधिक माहिती दिली.

COMMENTS