Ahmednagar :वाराईचा प्रशन बिकट…व्यापारी गेले जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Ahmednagar :वाराईचा प्रशन बिकट…व्यापारी गेले जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारी

अहमदनगर जिल्ह्यात कामगार संघटनांनी "ज्याचा माल त्याचा हमाल" ही भूमिका घेतली होती. तसेच ट्रान्सपोर्ट आणि ट्रक मालवाहतूक करणारे यांनी ही दिल्ली मध्ये क

राहत्या पालात तलावाचे पाणी शिरलेल्या आदिवासी बांधावांना मदत
पाथर्डी पूर्व भागात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ऋषिकेश ढाकणे यांनी पाहणी केली
जनतेच्या सुरक्षिततेसाठी सज्ज असणार्‍या पोलिस दलास कोरोना संरक्षणासाठी मास्क व सॅनीटायझरचे वाटप

अहमदनगर जिल्ह्यात कामगार संघटनांनी “ज्याचा माल त्याचा हमाल” ही भूमिका घेतली होती. तसेच ट्रान्सपोर्ट आणि ट्रक मालवाहतूक करणारे यांनी ही दिल्ली मध्ये कामगार समिती स्थापन केली होती. तसेच वाराई ही खरेदीदाराने द्यावी अशी ही मागणी या कामगारांनी केली होती. व्यापाऱ्यांवर फौजदारी  गुन्हे दाखल करावेत असे ही कामगारांचे म्हणणे होते. या संदर्भात अहमदनगर ओनियन मर्चंट्स असोसिएशन, अहमदनगर होलसेल मिरची मर्चंट असोसिएशन , अहमदनगर आडते बाजार मर्चंट असोसिएशन, तसेच अहमदनगर जॉगरी मर्चंट असोसिएशन यांच्यसह इतर ही होलसेल व्यपाऱ्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली  वाराई च्या संदर्भात  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्या प्रमाणे या प्रश्नावर लवकरात लवकर निर्णय घेऊ असे आश्वासन , जिल्हाधिकाऱ्यांनी दिले, अशी माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली.

https://www.youtube.com/watch?v=Y2MV7Bdb-gU

COMMENTS