Ahmednagar मध्ये वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा… ‘या’ हॉटेलमध्ये सुरु होता कुंटणखाना | Sex Racket (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Ahmednagar मध्ये वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा… ‘या’ हॉटेलमध्ये सुरु होता कुंटणखाना | Sex Racket (Video)

अहमदनगर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय सुरु आहे. अशाच एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर नगर तालुका पोलिसांनी छापा टाकला आ

गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करणे पोलिसाला पडले महागातl LokNews24
अहमदनगर जिल्ह्यात मेडीकल ऑक्सीजन पुरवठा आणि औषधसाठा पुरेसा उपलब्ध
अण्णासाहेब कडलग यांचे निधन

अहमदनगर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय सुरु आहे. अशाच एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर नगर तालुका पोलिसांनी छापा टाकला आहे. नगर – दौंड रस्त्यावर खंडाळा गावाजवळ असलेल्या राजयोग हॉटेलवर छापा टाकत पोलिसांनी देहविक्री करणाऱ्या दोन मुलींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी हॉटेलच्या नावाखाली कुंटणखाना चालविणाऱ्या हॉटेलमालक अक्षय अनिल कर्डीले वय २५ तसेच सौरभ अनिल कर्डीले यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच ग्राहक म्हणून आलेला विकी मनोहरलाल शर्मा वय २९, गणेश मनोहर लाड वय २१, संदीप पंडित जाधव वय २३ यांनाही अटक करण्यात आली आहे. याबाबत सहायक फौजदार जब्बार रहिमखा पठाण यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, सहायक निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक जारवाल यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे. हॉटेलमध्ये महिला व मुलींना देहविक्री करण्यासाठी बोलावून घेत कुंटणखाना चालवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली आहे. 

COMMENTS