Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदाबाद विमान अपघातात 242 प्रवाशांचा मृत्यूमृतांमध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश नागरिकांचा समावेश

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथुन झेपावलेले एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान गुरूवारी दुपारी कोसळून सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे

तोंड चाकाखाली जाणारच होतं तेवढ्यात …… l LOK News 24
कानपूरमध्ये पुन्हा रेल्वे घातपाताचा कट
मांदाडे अहवाल अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यांना उध्वस्त करणार : प्रा. सतिश राऊत
Image

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथुन झेपावलेले एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान गुरूवारी दुपारी कोसळून सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघात निवासी डॉक्टर राहत असलेल्या इमारतींवर कोसळले, त्यावेळी स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या रस्त्यांवर मृतदेह विखुरलेले आहेत. जळालेल्या मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले आहे, मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्याची शक्यता आहे.
विमानाला उड्डाण घेण्यासाठी थोडा उशीर झाल्यानंतर दुपारी 1.47 वाजता विमानाने उड्डाण घेतले होते. त्यानंतर अवघ्या 9 मिनिटांत हा अपघात झाला. एअर इंडियाच्या विमानात 230 प्रवासी होते. यामध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि एका कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता. उर्वरित 12 जण क्रू मेंबर्स होते. अपघातस्थळी सापडलेले बहुतेक मृतदेह इतके जळालेले आहेत की त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण आहे. डीएनए चाचणीनंतरच त्यांची ओळख पटवणे शक्य होईल. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला. ज्या इमारतीला विमान धडकले त्या इमारतीत अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर राहतात. माहितीनुसार, 15 डॉक्टर जखमी झाले आहेत.

तांत्रिक बिघाडामुळे दुर्घटना घडल्याचा अंदाज
या अपघातामागील नेमके कारण शोधण्यासाठी विमानन प्राधिकरण आणि तांत्रिक तज्ज्ञांनी तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष तज्ज्ञांचे पथक लवकरच ब्लॅक बॉक्सची तपासणी करणार असून, त्यानंतर अपघाताचे खरे कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. सध्या विमानात 133 प्रवासी असल्याची माहिती समोर आली असली तरी, अधिकृत दुजोरा प्रतीक्षेत आहे. तसेच, या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानातून प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती आहे.

मृतांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान कोसळल्यानंतर, अपघातग्रस्तांना उपचारांसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले जात आहे. तसेच, मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी आणले जात आहेत. रुग्णवाहिकांच्या कमतरतेमुळे, मृतदेह हातगाड्यांवर देखील आणण्यात आले. बहुतेक मृतदेह पूर्णपणे जळाले होते. रुग्णालयात ओ-निगेटिव्ह रक्ताचा तुटवडा आहे. रुग्णालयाने रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. गुजरात सरकारने मृतांच्या नातेवाईकांच्या आणि जखमींच्या सोयीसाठी 9978405304 आणि 07923251900 हे हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.

सुन्न आणि व्यथित करणारी घटना ः पंतप्रधान मोदी
अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना सुन्न आणि व्यथित करणारी असून देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. या दु:खद घटनेमुळे अनेकांचे मन हेलावून गेले आहे. या दुःखद प्रसंगी माझ्या सहवेदना सर्व पीडितांसोबत आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. या अपघाताने सर्वांची मनं हेलावून टाकली असून अनेकांचे जीवन उदध्वस्त झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्ट द्वारे दुःख व्यक्त केले आहे.

COMMENTS