Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यानगर : स्वामी समर्थ मंदिराचा वर्धापन दिन-प्रकट दिनाची उत्साहाने सांगता

अहिल्यानगर : सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोडवरील श्री.स्वामी समर्थ मंदिराचा 19 वा वर्धापन दिन, स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन मोठ्या उत्साहात, धा

कोल्हापुरात तिघांचा बुडून मृत्यू
भोंग्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करणार: मुख्यमंत्री फडणवीस
निलंबनातून शिक्षकांची हानी मात्र प्रशासनाची चांदी

अहिल्यानगर : सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोडवरील श्री.स्वामी समर्थ मंदिराचा 19 वा वर्धापन दिन, स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन मोठ्या उत्साहात, धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला. महाआरती महाप्रसादाने या उत्सवाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी आ.संग्राम जगताप, नगरसेवक निखिल वारे, अमोल गाडे, माजी नगरसेवक योगीराज गाडे, अविनाश निक्रड, नितीन शेलार,अजिंक्य बोरकर, कार्यकर्ते उपस्थित होते.  

     प्रती अक्कलकोट निवासी वटवृक्ष असलेल्या या मंदिराला 19 वर्षेपुर्ण झाली. श्री. स्वामी समर्थ यांच्या प्रकटदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये महिलांनी गुरुलिलामृत ग्रंथाचे सामुदायिक पारायण केले. गुढीपाडव्याला भक्तांनी मंदिरामध्ये गुढी उभारली. हिंदूनववर्षानिमित्त हजारो भाविकांनी पाडव्याला स्वामीचे दर्शन घेऊन नवीन संकल्प करीत सण साजरा केला. श्री. स्वामी समर्थ यांचा प्रकटदिन सोहळा यंदा भक्तांच्या गर्दीमुळे उत्साहात  पार पडला. ‘श्रीं’ना. रुद्राभिषेक, भव्य सजावट, भाविकांची गर्दी यामुळे मंदिर गजबजले होते. ‘श्रीं’च्या पादुकांची पालखी – रथ मिरवणुकीत महिलांनी मोठा सहभाग नोंदविला. सवाद्य मिरवणुकीने, स्वामींच्या नामघोषाने गुलमोहोर रोड, पारिजात चौक, पाईपलाईन रोड, श्रीराम चौका सह परिसर  दुमदुमला होता.चौकाचौकात भाविकांनी पादुकांचे पूजन करून दर्शनास गर्दी केली होती. प्रकट दिनाला महाआरतीसाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. स्वामी भक्त स्वत:हून रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेत. महाप्रसादाचा लाभ घेतला. या सोहळ्याची उत्साहात सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदिराचे सुनिल मानकर, जितेंद्र चत्तर, गिरिश धर्माधिकारी, पंकज गुजराथी, संतोष उपाध्ये, संजय देशपांडे, विजय तिमोणे, देवीदास म्हस्के, नितीन भिसे, संदिप पाटील, निखिल देवरे, किरण वाकडमाने, विनोद पोरे, शिवाजी दारकुंडे, रमेश म्याना, स्वप्नील वैद्य, हरिभाऊ लोंढे, प्रमोद भाळवणकर तसेच स्वामी भक्त सेवेकरी आदिंनी परिश्रम घेतले.

COMMENTS