Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यानगर: महावीर जयंतीनिमित्त जिल्ह्यातील मांस विक्री बंद ; इंजि. यश शहा यांच्या पाठपुराव्याला यश

अहिल्यानगर : देशभरात भगवान महावीर स्वामी जन्म कल्याण 10 एप्रिल रोजी संपर्णू देशात साजरी होणार आहे. भगवान महावीर स्वामींनी जगाला अहिंसा, जगा आ

खरीप हंगाम शेतकर्‍यांच्या हिताचा होण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन-पालकमंत्री
जिल्ह्यातील 2 हजार 620 महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित
वीज पुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून नवीन प्रकल्प कार्यान्वित होणार : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

अहिल्यानगर : देशभरात भगवान महावीर स्वामी जन्म कल्याण 10 एप्रिल रोजी संपर्णू देशात साजरी होणार आहे. भगवान महावीर स्वामींनी जगाला अहिंसा, जगा आणि जगु द्या हा संदेश दिला, त्याला अनुसरून शासन निर्णयानुसार 10 एप्रिल रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने व मांस विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहे.
भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक निमित्ताने निमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाचे एचएडब्ल्यू आर सदस्य तथा मिशन सेफ विहारचे अध्यक्ष इंजिनिअर यश प्रमोद शहा यांनी महाराष्ट्र शासन तसेच अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय यांना याबाबतीतला महाराष्ट्र शासन निर्णय, तथा अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया यांचे पत्र ईमेल द्वारे पाठवले होते. तसेच याबाबत फोनवरून जिल्हा प्रशासनास विनंती देखील केली होती, त्यानुसार जिल्हा प्रशासनाने मांस विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची कडक अंबलबजावणी करण्याबाबतचे संबंधित सर्व प्रशासन विभागाला पत्रक देखील जिल्हाप्रशासनाने तात्काळ जारी केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर, पोलिस अधीक्षक, अहिल्यानगर, आयुक्त, महानगरपालिका अहिल्यानगर, उपायुक्त पशुसंवर्धन, अहिल्यानगर, सर्व उपविभागीय दंडाधिकारी, सह आयुक्त. नगरपरिषद प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर, तसेच सर्व-तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी या सर्वांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने ई-मेल द्वारे आपल्या संबंधित विभागांमध्ये कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. यासोबतच यश शहा यांनी अहिल्यानगर महानगरपालिका तसेच जिल्हा पोलीस प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन विभाग व संबंधित सर्व विभागांना देखील ई-मेल व फोन द्वारे जिल्हा प्रशासनाचे आदेश पत्र पाठवले आहे व याची कडक अंमलबजावणी करण्याबाबत विनंती देखील संबंधित सर्व विभागात केली आहे.

COMMENTS