Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यानगर सहल बसला अपघात ; 15 विद्यार्थी जखमी

पुणे : जुन्नर तालुक्यातील शिवनेरी, ओझर आणि लेण्याद्री येथे सहलीसाठी निघालेल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या राज्य परिवहन (एसटी) बसचा ओतूर प

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर बसला भीषण आग, 25 जणांचा होरपळून मृत्यू
भीमाशंकर कडून कल्याण कडे जाणाऱ्या एसटीचा अपघात
बस दरीत कोसळून 7 प्रवाशांचा मृत्यू; उत्तराखंड अल्मोडा येथील अपघात

पुणे : जुन्नर तालुक्यातील शिवनेरी, ओझर आणि लेण्याद्री येथे सहलीसाठी निघालेल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या राज्य परिवहन (एसटी) बसचा ओतूर परिसरात अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बस दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत सुमारे 10 ते 15 विद्यार्थी जखमी झाले आहेत.
आहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील एकूण 53 विद्यार्थी सहलीसाठी निघाले होते. पहाटेच्या सुमारास कल्याण-आहिल्यानगर महामार्गावर ओतूरजवळ हा अपघात घडला. धडक इतकी जोरदार होती की बस रस्त्यावरच उलटली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि विद्यार्थ्यांना बसमधून सुरक्षित बाहेर काढले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून अपघाताची नोंद केली असून नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS