Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरीत 2 जूनला अहिल्यादेवी होळकरांचा जयंती उत्सव सोहळा

राहुरी ः पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी जयंती निमित्ताने होळकर शाहीचे अभ्यासक मांचीहिल शैक्षणिक व औद्योगिक संकुलाचे अध्यक्ष अ‍ॅड. शाळीग्राम होडगर यांचे

महाराष्ट्रात सलग १९ दिवसांपासून भारनियमन नाही
जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांची संजीवनीस भेट
पुढच्या 4 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज l पहा LokNews24

राहुरी ः पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी जयंती निमित्ताने होळकर शाहीचे अभ्यासक मांचीहिल शैक्षणिक व औद्योगिक संकुलाचे अध्यक्ष अ‍ॅड. शाळीग्राम होडगर यांचे व्याख्यान, रविवारी, 02 जून रोजी, राहुरी शहरातील अहिल्याभवन येथे सकाळी ठीक 10 ते 11 या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, विधानसभा सदस्य प्राजक्त दादा तनपुरे, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठ चे श्रीरंग गडदे, राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्‍वर ठोंबरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वैभव शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे युवराज कोकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाचरणे उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमती कौशल्याताई विटनोर या भूषवणार आहे. जयंती उत्सवाच्या निमित्ताने धनगर समाजातील मेंढपाळ कुटुंबातील तरुण खडतर परिश्रम घेऊन एम.पी.एस.सी परीक्षा उत्तीर्ण झालेले वैभव खंडू बाचकर, राज्य सहकार कर आयुक्त वर्ग-1, अजय रावसाहेब तमनर (प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी), विजय दशरथ तमनर (आरोग्य विस्तार अधिकारी), डॉक्टर वैभव गणपत वाकडे (पशुधन विकास अधिकारी), संतोष मच्छिंद्र तमनर (आरोग्य सेवा), रवींद्र सावळेराम सोडनर (प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी), सोमनाथ भाऊसाहेब भिसे (सिविल इंजिनिअर सामाजिक बांधकाम विभाग), रमेश भाऊसाहेब बाचकर (पशुधन पर्यवेक्षक), कुमारी प्रियांका शिवाजी तमनर (आरोग्य विभाग), ज्योती अर्जुन बाचकर (जिल्हा परिषद सिंधुदुर्ग), अमोल सुरेश बाचकर (महाराष्ट्र पोलिस) वैभव पिसाळ (महाराष्ट्र पोलिस) सचिन शिवाजी बाचकर (कृषी सहाय्य), लहू दादापाटील बाचर (पशुधन पर्यवेक्षक), स्नेहल संपत तमनर (आरोग्य विभाग), शितल बाबासाहेब माने (कृषी विभाग, नागपूर), योगेश तमनर (पोलिस मुख्यालय कार्यालयीन सहाय्यक, मुंबई), स्वाती तमनर पांडुळे (पशुधन पर्यवेक्षक), सोपान बाचकर (आयकर विभाग), निखिल तुकाराम हिरगळ (कृषी सहाय्यक नाशिक विभाग) यांच्यासह वेगवेगळ्या शासकीय अधिकार्‍यांचा ही गुणगौरव होणार आहे.
तसेच सामाजिक प्रतिष्ठानने 299 व्या जयंतीचे औचित्य साधून पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने श्रीशक्ती सन्मान सोहळा आयोजित केला आहे.यामध्ये जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती ताराबाई विटनोर, महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती श्रीमती कलावती ताई शेळके, नगरसेवक श्रीमती शारदाताई ढवान, राहुरी येथील आदर्श गृहिणी श्रीमती विमलताई तमनर, श्रीमती संध्याताई गडदे, वांबोरी ग्रामपंचायतच्या उपसरपंच श्रीमती मंदाताई भिटे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्रीमती प्रतिभा खेमनर-तमनर, साईधाम हॉस्पिटलच्या डॉक्टर सोनाली माने, मुळा धरण संघर्ष समितीच्या प्रमुख वर्षाताई बाचकर, त्वचारोग तज्ज्ञ अस्मिता महेश लाटे, साकुरच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर अनुराधा खेमनर-शिंदे, मुख्याध्यापिका आशा राजेंद्र धरम, अ‍ॅक्सेस बँकेच्या शाखाधिकारी प्रियांका हजारे-डोलनर, राहुरीच्या नगरसेविका द्वारकाताई सदाशिव सरोदे, राहुरी खुर्दच्या ग्रामपंचायत सदस्या मनीषा शिवाजी शेंडे, महाराष्ट्र पोलीस स्वाती बाळासाहेब बाचकर या सर्व रणरागिने महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान यांच्यावतीने आव्हान करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची खास वैशिष्ट्ये – होळकरशाहीचा इतिहास यावर विस्तृत व्याख्यान व माहितीपट
मेंढपाळ अशिक्षित कुटुंबातील अधिकार्‍यांचा गुणगौरव सोहळा
आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या कर्तुत्ववान श्रीशक्तीचा सन्मान
धनगरी ढोल व पारंपारिक वाद्यांनी स्वागत, कार्यक्रमानंतर महाप्रसाद

COMMENTS