Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेती क्षेत्रामध्ये आधुनिकता आणली पाहिजे : खा. शरद पवार

लोणंद / प्रतिनिधी : दिवसेंदिवस हा कृषि महोत्सव शेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्वाचा उत्सव होऊन बसला आहे. शेती क्षेत्रामध्ये आधुनिकता आणली पाहिजे. न

कोविडच्या नव्या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी उपाययोजना कराव्यात : ना. शंभूराज देसाई
आरआयटी डिप्लोमाला राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट किताब
प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करु : ना. उदय सामंत

लोणंद / प्रतिनिधी : दिवसेंदिवस हा कृषि महोत्सव शेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्वाचा उत्सव होऊन बसला आहे. शेती क्षेत्रामध्ये आधुनिकता आणली पाहिजे. नवीन बी बियाणे वापरले पाहिजे. पीक येण्याच्या पध्दतीमध्ये जे बदल होत आहेत.
त्याची नोंद घेतली पाहिजे. हे शेवटच्या शेतकर्‍यांपर्यंत पोहचवायचे असेल तर अशा प्रकारच्या महोत्सवाचा उपयोग त्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. नेमका हाच दृष्टीकोन बाळगुन हा उपक्रम लोणंदमध्ये दिवसेंदिवस अधिक घवघवीत होतोय. याचा मला मनापासुनचा आनंद आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार यांनी केले.
ते लोणंद, ता. खंडाळा येथे सुवर्णगाथा प्रतिष्ठान, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर प्रतिष्ठान, ग्रीनफिल्ड कृषी मॉल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शरद कृषी महोत्सवात बोलत होते. यावेळी कार्यक्रम प्रसंगी विधानपरिषदेचे माजी सभापती आ. श्री. रामराजे नाईक निंबाळकर, खा. श्रीनिवास पाटील, खा. सुप्रिया सुळे, आ. बाळासाहेब पाटील आ. शशिकांत शिंदे, आ. दीपक चव्हाण, आ. मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, डॉ. नितीन सावंत, नगराध्यक्ष मधुमती गालिंदे, उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके, दयाभाऊ खरात, नितीन भरगुडे पाटील, दत्ता ढमाळ, रमेश धायगुडे, राजेंद्र तांबे, दीपाली साळुंखे, मनोज पवार, उदय कबुले, हणमंतराव शेळके, सुचेता हाडंबर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि आ. मकरंद पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ग्रीन फिल्डचे अभिजित घोरपडे यांना शरद कृषिरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कृषी संदर्भात ज्ञानेश्‍वर बोडके यांच्या व्याख्यानाचा लाभ उपस्थिती सर्वांनी घेतला. कृषीदिंडीने महोत्सवास प्रारंभ करण्यात आला.
हे कृषी प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी सुवर्णगाथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत यांच्यासह उपाध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, सचिव गजेंद्र मुसळे, मयूरराज गायकवाड, सागर शेळके, संभाजी घाडगे, योगेश क्षीरसागर, हणमंत शेळके, शशिकांत जाधव, रमेश धायगुडे, ज्ञानेश्‍वर ससाणे, राहिद सय्यद व इतर मेहनत घेत आहेत. कृषी महोत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

COMMENTS