Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषिमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर

धुळे प्रतिनिधी - राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांनी धुळे तालुका, साक्री तसेच शिंदखेडा या भागातील अवका

प्रतापगड कारखान्याच्या 21 जागांसाठी 83 उमेवारांचे अर्ज दाखल
Osmanabad : सिना कोळेगाव धरण भरण्याच्या मार्गावर धरण काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा (Video)
महात्मा फुले कृषि विद्यापीठात सॉफ्टवेअरचे दोन आठवड्याचे प्रशिक्षण संपन्न

धुळे प्रतिनिधी – राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांनी धुळे तालुका, साक्री तसेच शिंदखेडा या भागातील अवकाळी पाऊस आणि गारपीटीच्या झालेल्या नुकसानीचे ते पाहणी करणार असून धुळे तालुक्यातील आनंद खेडा येथे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

एकीकडे राज्यात गुढीपाडव्याचा सण साजरा होत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांवर आलेल्या अस्मानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे पूर्ण व्हावेत तसेच त्यांच्यापर्यंत मदत पोहोचावी यासाठी आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जात असून येत्या 25 तारखेपर्यंत पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर मदत घोषित केली जाईल, असे आश्वासन यावेळी अब्दुल सत्तार यांनी दिले आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी दुसरीकडे मात्र वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा देखील शेतकऱ्यांना फटका बसत आहे. विद्युत डीपी वेळेवर बसवली जात नसल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार यावेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे एका शेतकऱ्याने केली.

यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्या पुढे मांडल्या,

वीज वितरण महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना डीपी संदर्भात वेळोवेळी तक्रारी करून ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करता महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभार कसा चालतो त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, असे शेतकऱ्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले. यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अश्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले.

COMMENTS