सिल्लोड/प्रतिनिधी ः महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठाचे संशोधन, अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकर्यांना एकाच ठिकाणी पाहण्याचा सुवर्णयोग हा महाराष्ट
सिल्लोड/प्रतिनिधी ः महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठाचे संशोधन, अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकर्यांना एकाच ठिकाणी पाहण्याचा सुवर्णयोग हा महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आला असून सिल्लोड मधील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन शेतकर्यांसाठी दिशा दर्शक ठरेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
अतिशय भव्य तरीही शिस्तबद्ध नियोजन व शेतकर्यांचा उदंड प्रतिसाद पाहून आपण भारावून गेलो असल्याचे स्पष्ट करीत प्रदर्शनातील नियोजन व येथील उपक्रम पाहून मुख्यमंत्र्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह कृषी विभाग व संबंधित शासकीय यंत्रणेचे कौतुक केले. सिल्लोड येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सव व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 चा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री अतुल सावे, खा. इम्तियाज जलील , कृषी आयुक्त सुनील चव्हाण उपनगराध्यक्ष अब्दुल समीर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील विविध ठिकाणच्या जवळपास दिडलाख हुन अधिक शेतकर्यांनी भेट दिली. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. विविध ठिकाणच्या दालनाला भेट देत शेतकर्यांनी कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. प्रदर्शनात शेतकर्यांमध्ये अतिशय उत्साह दिसून आला. अनेक ठिकाणी शेतकरी आपल्या मोबाईल मध्ये प्रदर्शनातील क्षण चित्रे टिपत होते तर काही जण सेल्फी घेताना दिसले. जातांना येतांना शेतकर्यांमध्ये प्रदर्शनाची चर्चा सुरूच होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह इतर मंत्र्यांनी प्रदर्शनातील विविध दालनास भेट दिली. या दालनात विद्यापीठाच्या वतीने विकसित तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके, उत्पादनक्षम शेती, एकात्मिक पीक व्यवस्थापण, पाणलोट क्षेत्र विकास यासह कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध दालनातील आयोजकांशी संवाद साधून माहिती जाणून घेतली यामुळे सर्वांचाच उत्साह द्विगुणीत झाला. शेतकर्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने राज्य सरकार विविध उपक्रम राबवित आहे. अपेक्षित उत्पादन वाढीसाठी शेतकर्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. यासाठी शेतकर्यांना कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन प्रयोग, माहिती, बियाणे यांची सखोल माहिती व्हावी यासाठी सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. शेतकर्यांनी अत्याधुनिक शेतीचा अवलंब केल्याने अपेक्षित उत्पादन मिळून आर्थिक हातभात लाभेल यासाठी शेतकर्यांनी या कृषी प्रदर्शनात भेट देऊन शेती विषयक अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी 5 जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून राज्यातील शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
COMMENTS