कृषी विभागाची कृषी मॉल संकल्पना शेतकऱ्यासाठी संजीवनीच : जयंत पाटील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषी विभागाची कृषी मॉल संकल्पना शेतकऱ्यासाठी संजीवनीच : जयंत पाटील

सांगली : सेंद्रिय कृषी मालाला योग्य भाव व बाजारपेठ मिळण्यासाठी त्याबरोबर सेंद्रिय मालाचे होणारे उत्पादन तात्काळ थेट ग्रहाकांपर्यत जाण्यासाठी कृषी विभ

मंत्री भुजबळांच्या अडचणीत पुन्हा वाढ
सोलापूरातील 3 सराईत गुन्हेगाराना केले तडीपार ..| माझं गावं माझी बातमी | LokNews24 |
‘छगन भुजबळ ‘ओबीसी आरक्षण’, ‘ओबीसी आरक्षण’, असे ओरडत फिरतात… मात्र सरकार असूनही काही करू शकले नाही

सांगली : सेंद्रिय कृषी मालाला योग्य भाव व बाजारपेठ मिळण्यासाठी त्याबरोबर सेंद्रिय मालाचे होणारे उत्पादन तात्काळ थेट ग्रहाकांपर्यत जाण्यासाठी कृषी विभागाची कृषी मॉल ही संकल्पना शेतकऱ्यासाठी संजीवनीच ठरेल, असा विश्वास जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
वाळवा तालुक्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालय व तालुका बीजगुणन केंद्र इस्लामपुर प्रक्षेत्रावरील ॲग्री मॉलचे लोकार्पण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य देवराज पाटील, पंचायत समिती वाळवा सभापती शुभांगीताई पाटील, मिरज उपविभागीय कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, वाळवा तालुका कृषि अधिकारी भगवानराव माने, कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सेंद्रीय कृषी माल उत्पादकांना हक्काची बाजारपेठ मिळावी, योग्य दर मिळावा तसेच कृषी मालाच्या उत्पादनाबाबत मार्गदर्शन लाभावे यासाठी कृषी विभागाने गतीने काम करावे. कृषी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांमधून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच कृषी विभागाकडून ॲग्री मॉल ही संकल्पना प्रभावी व विस्तारीतपणे राबवावी. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रत्येक स्टॉलला भेट दिली. स्टॉलवर वाळवा तालुक्यातील सेंद्रिय उत्पादक गट व सेंद्रिय शेती करणारे शेतकरी यांची उत्पादने ठेवण्यात आली होती.

COMMENTS