अहमदनगर/प्रतिनिधी ः लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाने जर्मनी मधील नामांकित व्याटका पट

अहमदनगर/प्रतिनिधी ः लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाने जर्मनी मधील नामांकित व्याटका पट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आणि नेक्स्ट टू सन एर्जी या सौर उर्जा तंत्रज्ञान विकसित करणा-या कंपन्यांशी सामंजस्य करार केला असल्याची माहिती महसूल मंत्री आणि संस्थेचे चेअरमन राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मुंबई येथील हॉटेल ताज मध्ये सौर उर्जा प्रकल्पा संदर्भात झालेल्या विशेष बैठकीत उपमुख्यमंत्री आणि उर्जामंत्री ना.देवेंद्र फडणवीस, जर्मनी देशाचे व्हाइस चान्सलर रॉबर्ट हाव्यक व त्यांच्या मंत्री मंडळातील सहकार्यांसमवेत या सामजस्य करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या. कृषी महाविद्यालच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे या संस्थेच्या वतीने उपस्थित होत्या. सदर करारानुसार जर्मनीतील या दोन मानांकित कंपन्या प्रवरेच्या कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावरती व्हर्टीकल बायफेसिअल सोलर तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक तयार करणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या वापराने शेतकर्यांना नेहमीची शेती करत असतांना सौर उर्जा निर्मीती करणे शक्य होणार आहे. सदर तंत्रज्ञान हे नेक्स्ट टू सन एर्जी या कंपनीने विकसित केलेले असून संपूर्ण जगभरामध्ये याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम व्याटक्राफ्ट इंडस्ट्रीज प्रा. लि ही कंपनी करणार आहे. सदर प्रात्यक्षिक प्रकल्पासाठी संपूर्ण भारतातून एकमेव प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाची निवड करण्यात आली असल्याचे विखे पाटील म्हणाले. कृषी महाविद्यालयाने सौर ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या प्रगतीकारक निर्णयाबद्दल संस्थेचे विश्वस्त माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खा.डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे आदींनी कृषी महाविद्यालयाचे अभिनंदन केले आहे.
कोट-
प्रवरा शैक्षणिक संकुल हे नेहमीच नाविण्यपुर्ण उपक्रमातून शिक्षणासोबतच विविध प्रकल्प राबवित असते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सौर ऊर्जा प्रकल्पाला मिळत असलेले पाठबळ महत्वपूर्ण असून, या करारामुळे सौर ऊर्जेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने टाकलेले पाऊल महत्वपूर्ण आहे. सौर उर्जेचा वापर करण्यासाठी हा प्रकल्प मार्गदर्शक ठरेल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.
राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री
COMMENTS