Homeताज्या बातम्यादेश

अग्निपथमुळे देशाचे सामर्थ्य वाढेल

कारगिल विजय दिनी पंतधान मोदींचे प्रतिपादन

नवी दिल्ली ः अग्निपथ योजना ही महत्वपूर्ण सुधारणांपैकी एक असून, या योजनेचा उद्देश सैन्याला तरुण आणि सतत युद्धासाठी सज्ज ठेवणे हा असून, या संवेदनशी

अखेर मोदी परदेश दौऱ्यासाठी रवाना… अमेरिकेत करणार ‘ही’ कामे…
नवीन संसद आत्मनिर्भरतेची साक्ष बनेल – पंतप्रधान मोदी
दोषींवर कठोर कारवाई करणार ः पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली ः अग्निपथ योजना ही महत्वपूर्ण सुधारणांपैकी एक असून, या योजनेचा उद्देश सैन्याला तरुण आणि सतत युद्धासाठी सज्ज ठेवणे हा असून, या संवेदनशील विषयाच्या बाबतीत होत असलेल्या स्पष्ट राजकारणाकरणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अग्निपथ योजनेमुळे देशाची ताकद वाढेल आणि देशाला सक्षम तरूणही मिळतील अशी अपेक्षा कारगिल विजय दिनी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.
25 व्या कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी कारगिल युध्द स्मारकाला भेट देऊन देशसेवेसाठी कर्तव्यावर असताना सर्वोच्च बलिदान देणार्‍या शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, लडाखची वैभवशाली भूमी 25 व्या कारगिल विजय दिनाची साक्षीदार आहे. कारगिल विजय दिन आपल्याला देशासाठी केलेली समर्पणे अमर होतात याचे स्मरण करून देतो, पंतप्रधान म्हणाले.कितीही महिने, वर्षे, दशके आणि शतके निघून गेली तरीही देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी केलेली प्राणार्पणे आपण विसरू शकणार नाही ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. देश आपल्या सशस्त्र दलांतील सामर्थ्यवान सैनिकांच्या कायमच्या ऋणात आहे आणि त्यांच्याप्रती अत्यंत कृतज्ञ आहे.  कारगिल युद्धाच्या वेळचे दिवस आठवून पंतप्रधान म्हणाले की तेव्हा आपल्या सैनिकांमध्ये उपस्थित राहण्याचे भाग्य त्यांना लाभले. ते म्हणाले की त्यावेळी एवढ्या उंचीवर कठीण मोहिमा पार पाडणे आपल्या सैनिकांसाठी किती जिकीरीचे होते हे अजूनही आठवते. मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदाने देणार्‍या त्या शूर देशपुत्रांना मी सलाम करतो, मोदी म्हणाले. कारगिलमध्ये आपण केवळ युद्ध जिंकले नाही तर सत्य,

प्रतिरोध आणि सामर्थ्याचे अतुलनीय उदाहरण आपण सर्वांसमोर ठेवले, पंतप्रधान म्हणाले. जेव्हा भारत शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करत होता त्यावेळी पाकिस्तानने केलेल्या कपटी कारवायांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. सत्याने शेवटी खोटेपणा आणि दहशतवादाला गुडघे टेकायला लावले,असे  ते पुढे म्हणाले. दहशतवादाची निंदा करत पंतप्रधान म्हणाले की, पाकिस्तानला भूतकाळात नेहमीच हार पत्करावी लागली आहे. पाकिस्तानने त्याच्या भूतकाळापासून काहीही धडा घेतला नाही आणि अजूनही त्या देशाने दहशतवाद आणि लहानमोठ्या चकमकींच्या रुपात युध्द खेळाने सुरूच ठेवले आहे, पंतप्रधान पुढे म्हणाले. दहशतवाद्यांचे नापाक इरादे कधीही यशस्वी होणार नाहीत अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. आपले शूर सैनिक दहशतवादाचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडतील, असे ते पुढे म्हणाले. लडाख असो किंवा जम्मू आणि काश्मीर, देशाच्या कोणत्याही भागातील विकासाच्या मार्गात येणार्‍या सर्व आव्हानांवर भारत मात करेल, पंतप्रधान म्हणाले. आजपासून काही दिवसांतच म्हणजे 5 ऑगस्ट रोजी कलम 370 रद्द झाल्याच्या घटनेला 5 वर्षे पूर्ण होतील याची सर्वांना आठवण करून देऊन ते म्हणाले की आजच्या जम्मू आणि काश्मीरमधील नागरिक स्वप्नांनी भरलेल्या नव्या भविष्याबाबत चर्चा करत आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये होऊ लागलेल्या प्रगतीची उदाहरणे देऊन पंतप्रधानांनी जी-20 बैठकींचे आयोजन, पायाभूत सुविधा विकास तसेच पर्यटनावर सरकारने दिलेला भर, चित्रपटगृहे सुरु करणे आणि सुमारे साडेतीन दशकांनंतर ताजिया मिरवणूक सुरु करणे इत्यादी घटनांचा उल्लेख केला. धरतीवरील हा स्वर्ग शांतता आणि समृद्धतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, पंतप्रधानांनी सांगितले.

शिंकून खिंड बोगदा संधीची कवाडे उघडेल – लडाख भागात होत असलेल्या घडामोडी अधोरेखित करून पंतप्रधान मोदी म्हणाले की, शिंकून खिंड बोगद्यामुळे लडाखचा केंद्रशासित प्रदेश वर्षभर सगळ्या मोसमांत उर्वरित देशाच्या संपर्कात राहील. हा बोगदा लडाखच्या विकासासाठी तसेच अधिक उत्तम उत्तम भविष्यासाठी नव्या संधींची कवाडे उघडेल, ते म्हणाले. लडाखमधील नागरिकांचे अभिनंदन करत पंतप्रधान म्हणाले की हा बोगदा त्यांचे जीवनमान अधिक सुखकर करेल कारण या भागातील अतितीव्र हवामानामुळे त्यांना ज्या असंख्य अडचणी येतात त्या आता कमी होतील. पंतप्रधान मोदी यांनी आभासी पद्धतीने लडाख येथील शिंकून खिंड  बोगदा प्रकल्पाच्या कार्याचा शुभारंभी सुरुंगस्फोट पाहिला. शिंकून खिंड बोगदा प्रकल्पाअंतर्गत निमु-पादुम-दारचा मार्गावर सुमारे 15,800 फुट उंचीवर 4.1 किमी लांबीचा दुहेरी-ट्यूब बोगदा उभारण्यात येणार आहे.  

COMMENTS