Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांचे आझाद मैदानावर आंदोलन; प्रसंगी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा

कराड / प्रतिनिधी : नियमीत कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे, शेती पंपाला दिवसा आठ तास मोफत विज द्यावी, दुधाच्या खरेदीच

रखडलेल्या पेरणीच्या कामांना पुन्हा एकदा सुरुवात
नागवडेची बाजार भावाची घोषणा म्हणजे मृगजळ : केशवराव मगर
कृष्णा नदीकाठी 8 फूटी मगर विश्रांतीला, प्रशासन सतर्क

कराड / प्रतिनिधी : नियमीत कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे, शेती पंपाला दिवसा आठ तास मोफत विज द्यावी, दुधाच्या खरेदीची बिले मिळावी, राज्यात गुंठेवारी विक्री सुरु करावी आदी मागण्यांसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने गुरुवार, दि. 23 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर शेतकर्‍यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिली. दरम्यान या प्रश्‍नावर मुख्य सचिवांनी त्यांच्या स्तरावर तोडगा न काढल्यास गेट वे ऑफ इंडीया येथे जावून समुद्रात जलसमाधी घेतील, असा इशाराही त्यांनी दिली आहे.
आंदोलनाची माहिती देण्यासाठी आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, चंद्रकांत यादव, अशोक पाटील, उत्तमराव खबाले, पोपट थोरात उपस्थित होते.
पाटील म्हणाले, राज्य सरकाराने दोन वर्षापूर्वी नियमीत कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्यावेळी शेतकर्‍यांनी सावकारांकडून कर्ज घेवून बॅँकांचे कर्ज भरले. मात्र, आजअखेर एक रुपायाही मिळाला नाही. संपुर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती. तीही अजुन झाली नाही. सरकारने शेती पंपाला दिवसा आठ तास विज मोफत देण्याची घोषणा केली होती. तीही सत्यात उतरली नाही. रात्री विज दिली जात असल्याने शेतकर्‍यांना बिबट्यासारख्या वन्य प्राण्यामुळे जीवास मुकावे लागत आहे. त्यामुळे तातडीने दिवसा वीज मिळावी.
सध्या दुधाची खरेदी किलोवर केली जात आहे. मात्र, त्याची बिले लिटरवर दिली जात आहेत. हा शेतकर्‍यांवर दरोडा टाकण्याचा प्रकार आहे. तो बंद करावा. राज्यात गुंठेवारी खरेदी-विक्री बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर अन्याय झाला आहे. शेतकर्‍यांना गरजेवेळी दोन-चार गुंठे जमीन विकून त्याला गरज भागवता येत होती. मात्र, गुंठेवारी बंद केल्याने अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍याला जगुही द्यायचे नाही आणि मरुनही द्यायचे नाही, असे सरकारचे धोरण आहे. त्याविरोधात आम्ही गुरुवारी मुंबईच्या आझाद मैदानावर सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन करत आहोत. त्यासाठी राज्यातून शेतकरी येणार आहेत. राज्य सरकारचे मुख्य सचिवांनी त्यांच्या स्तरावर या प्रश्‍नांचा निर्णय घ्यावा. अन्यथा शेतकरी गेट वे ऑफ इंडीया येथे जावुन समुद्रात जलसमाधी घेतील.

COMMENTS