Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारामतीमध्ये धनगर समाजाचे आंदोलन

उपमुुख्यमंत्री पवारांच्या निवासासमोर ठिय्या

बारामती : धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथील निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी समोर धनगर समाजाने आज

सोलापुरात आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक
लोक म्हणाले पिऊन पडलाय, त्याने ओळखलं पोलिसाला हार्ट अटॅक आलाय
धनी मला ही दाखवा ना विठूरायाची पंढरी !

बारामती : धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथील निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी समोर धनगर समाजाने आज ठिय्या आंदोलन केले. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथील निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी समोर धनगर समाजाने रविवारी ठिय्या आंदोलन केले.
पोलिसांनी गेटसमोर आंदोलन करण्यास मज्जाव केल्याने आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडून रास्ता रोको केला. तब्बल दिड तास चाललेल्या या आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतून ठप्प झाली होती. दरम्यान अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी बारामतीतील प्रशासकीय भवनासमोर गेले दहा दिवस चंद्रकांत वाघमोडे आमरण उपोषणासाठी बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. मात्र या आंदोलनाची दखल कोणत्याही लोकप्रतिनीधीने न घेतल्यामुळे काल आंदोलनाची दिशा बदलण्यात आली आणि राज्यातील आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय काल घेण्यात आला होता. त्यानुसार आज बारामती येथील सहयोग सोसायटी समोर धनगर समाजाने आंदोलन केले. यावेळी पोलिसांकडून सहयोग सोसायटी आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी आंदोलकांनी काही काळ बारामती भिगवन रस्त्यावर रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी केली. तर प्रशासकीय भावना समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, पुणे ग्रामीण अधीक्षक अंकित गोयल यांनी भेट दिली. तर काल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील भेट दिली आहे.

COMMENTS