Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत सरपंच संघटनेचे विविध मागण्यासाठी आंदोलन

क्रांतीदिनी आझाद मैदानावर आंदोलन ः बाबासाहेब पावसे पाटील

संगमनेरः राजकीय पक्षाशी हित संबंध नसले सरपंच संघटना राज्यभर कार्यरत आहे राज्यातील सरपंच उपसरपंच सदस्यांच्या विविध मागण्यासाठी मुंबई आझाद मैदान मो

डेंटल कॉलेज एनएसएस विद्यार्थ्यांचा दंडकारण्यात सक्रिय सहभाग
शुक्राचार्य महाराजांची मूर्ती स्थापित करणे मोठे कार्य
*आरक्षण यासंदर्भात काँग्रेसच्या मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; केली ‘ही’ मागणी | LokNews24

संगमनेरः राजकीय पक्षाशी हित संबंध नसले सरपंच संघटना राज्यभर कार्यरत आहे राज्यातील सरपंच उपसरपंच सदस्यांच्या विविध मागण्यासाठी मुंबई आझाद मैदान मोर्चा धरणे आंदोलन सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्याच्या प्रलंबित मागण्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्काळ सोडाव्यात या मागण्याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी घेऊन मागण्या सोडविण्याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करावी. अधिवेशना दरम्यान विधानभवनात झालेल्या बैठकीत दिलेल्या आश्‍वासनाची  अंमलबजावणी करावी यासाठी शुक्रवार दि 9 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता पुन्हा धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच संघटीत चळवळीचे नेतृत्व बाबासाहेब पावसे पाटील, अँड प्रविण कडाळे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
सरपंचाच्या मागण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे मंत्री महाजन यांनी सरपंचांच्या शिष्टमंडळाला  सांगत लवकरच मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सरपंच सेवा संघाच्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनात जाऊन भेट घेतली. सरपंचाच्या मागण्या सोडविण्याबाबत त्यांना साकडे घातले परतू अबलबजावणी होत नाही. सरपंच उपसरपंच यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा सरपंच सेवा संघाचे  सरपंच संघटीत चळवळीचे नेतृत्व बाबासाहेब पावसे, आदर्श सरपंच अशोक ओहळ, विजय पाटील, अविनाश पवार, नंदकुमार कदम, अरूण खरमाटे, डॉ तान्हाजी पाटील, सौ पुजा जाधव, जानु गायकर, लता खोत, संजय काळे, बाबाजी गुळवे, निलेश पावसे, सोमनाथ नाडे, रोहित पवार, अमोलशेवाळे, रविंद्र पवार यांनी  राज्य सरकारला दिला आहे.

COMMENTS