Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘मविआ’ची जागा वाटपात ‘आघाडी’ !

खा. शरद पवारांच्या घरी जागावाटपांवर चर्चा

मुंबई ः विधानसभा निवडणुकीसाठी अजूनही अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी असला तरी, लोकसभेप्रमाणेच विधानसभा जागा वाटपांमध्ये महाविकास आघाडीने आघाडी घेत

कुंभार समाजातर्फे समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा
बालगृहातील ५२९ विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेत घवघवीत यश; मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले अभिनंदन
नगरकरांनो, काम चालू…स्टेशन रोड राहणार बंद ; उड्डाणपुल व पाईपलाईन कामामुळे रविवारपासून वाहतुकीत होणार बदल

मुंबई ः विधानसभा निवडणुकीसाठी अजूनही अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी असला तरी, लोकसभेप्रमाणेच विधानसभा जागा वाटपांमध्ये महाविकास आघाडीने आघाडी घेतल्याचे समोर येत आहे. कारण महाविकास आघाडीचे प्रमुख नेते खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी नुकतीच खासदार शरद पवार यांच्या घरी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक झाली, यात जागा वाटपांवर चर्चा झाली असल्याचे समोर येत आहे.
महायुतीमध्ये जागा वाटपांवर अजूूनही कोणतेही फायनल झाले नसतांना, महाविकास आघाडीने जागा वाटपांत आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. खासदार शरद पवारांच्या घरी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँगे्रस नेते नाना पटोले आणि बाळासाहेब थोरता यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महत्त्वाची चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची एक समन्वय समिती तयार करून या समितीच्या माध्यमातून चर्चा करायला सुरुवात होणार आहे. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार महाविकास आघाडीतील विद्यमान आमदारांच्या पहिल्या जागा त्या-त्या पक्षांना वाटल्या जातील. त्यानंतर सत्ताधारी पक्षांच्या मतदार संघांमध्ये महाविकास आघाडीमधील ज्या पक्षाची जास्त ताकद असेल, त्या पक्षाला ती जागा सोडली जाणार आहे. या सूत्रानुसार लवकरात लवकर जागांची चाचपणी करायला सुरुवात करण्याचे आदेश पदाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. या बैठकीत संपूर्ण जागावाटप कसे होणार, हे स्पष्ट झाले नसले तरी काही जागांबाबत अंतिम निर्णय झाला आहे. प्राथमिक जागावाटपासाठी नेत्यांनी सूत्र निश्‍चित केले आहे. त्यानुसार आता महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप होणार असल्याचे दिसून येत आहे.

लोकसभेचा अनुभव गाठीशी ! – महाविकास आघाडी अर्थात तीन पक्षाची आघाडी म्हणून आघाडीची हेटाळणी करण्यात येत होती. मात्र लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकत महायुतीच्या तोंडचे पाणी पळवले होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पाठीशी लोकसभा निवडणूक जिंकण्याचा अनुभव गाठीशी असून, याच बळावर महाविकास आघाडी जागावाटपांवर चर्चा करतांना दिसून येत आहे. जागावाटप केल्यास उमेदवारांना  निवडणुकीची तयारी करण्यास आणि वातावरण निर्मितीसाठी वेळ मिळतो, त्यामुळे जागावाटप आणि उमेदवार फायन करण्यात महाविकास आघाडी जलदगतीने पावले टाकतांना दिसून येत आहे.

तिन्ही पक्षांची समन्वय समिती करणार स्थापन – ज्या मतदारसंघांमध्ये ज्या पक्षाची जास्त ताकद त्यांना तो मतदारसंघ सोडला जाणार आहे. यावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांच्या झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली. त्यानुसार महाविकास आघाडीतील विद्यमान आमदारांच्या पहिल्या जागा त्या पक्षांना वाटल्या जातील. त्यानंतर सत्ताधारी पक्षांच्या मतदार संघांमध्ये महाविकास आघाडीतील ज्या पक्षाची जास्त ताकद आहे, त्या पक्षाला ती जागा सोडली जाईल. या सूत्रानुसार लवकरात लवकर जागांची चाचपणी करायला सुरुवात करण्याचे आदेश काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची एक समन्वय समिती तयार करून यावरती चर्चा करायला सुरुवात होणार आहे.

COMMENTS