इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर शहरातील ‘पंक्या मुळीक गँग‘ मध्ये असलेल्या पाच जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव विशेष
इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर शहरातील ‘पंक्या मुळीक गँग‘ मध्ये असलेल्या पाच जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी पक्या मुळीक गँगमधील पंकज मुळीक, सुरज बाबर, अजित उर्फ राजकुमार दोडमनी, उमेश नाईक व ओमकार नाईक यांनी प्रथमेश प्रथमेश कांबळे याला तू विक्रांत शिरसागर याचे बरोबर का फिरतोस असे म्हणून कॉकस हॉटेल, इस्लामपूर येथे बोलावून मोटर सायकलवरून बेघर वसाहत येथे नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली होती. त्यानंतर प्रथमेश कांबळे यास मोटर सायकलवर बसवून पेठ गावच्या हद्दीत जुन्या बंद पडलेल्या व्यायाम शाळेजवळ घेऊन जाऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. सुरज बाबर याने तेथे पडलेला लोखंडी गज उचलून प्रथमेश यास जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारला असता प्रथमेश खाली वाकल्याने तो लोखंडी गज फिर्यादीच्या पाटी लागला व जर पोलिसात तक्रार करशील तर तुला जीवे मारून टाकू, तुला सोडणार नाही, तुझा कायमचा काटा काढू अशी धमकी देऊन आष्टा नाका येथे सोडून गेले होते.
‘पंक्या मुळीक गँग‘ या टोळी विरुध्द खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी करताना जखमी करणे, जबरी चोरी, घरफोडी, सावकारी, अपहरण करणे, हत्यारानिशी दुखापत करणे, गर्दी मारामारी करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, शिवीगाळ व दमदाटी करणे असे एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील सर्व आरोपींविरोधी विरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई कारवाई होणेबाबतचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांना पाठवला होता. त्यास त्यांनी 5 नोव्हेंबर 2021 रोजी मंजुरी दिली. या गुन्ह्यास मोक्का कायद्यातील कलमांचा अंतर्भाव केला आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे करत आहेत.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, सपोनि प्रवीण साळुंखे कॉन्स्टेबल संदीप सावंत, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुतार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
COMMENTS