Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लेखी आश्‍वासनानंतर श्रीगोंद्यातील वीज प्रश्‍नांवरील आंदोलन स्थगित

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : वीजेच्या संदर्भातील कामे 31 मे पूर्वी लाईन दुरुस्ती े कामे करणार असल्याचे उपअभियंता सुर्यवंशी यांनी दिलेल्या लेखी आश्‍व

बंदी असलेल्या सुगंधी तंबाखू साठ्यावर कोतवाली पोलिसांची धाडसी कारवाई
मार्केट यार्ड चौकात कोरोनारुपी रावणाचे दहन
पत्र्यांचे छत असलेल्या मतदान केंद्रांवर उन्हाच्या संरक्षणासाठी पाचट टाकावेत

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : वीजेच्या संदर्भातील कामे 31 मे पूर्वी लाईन दुरुस्ती े कामे करणार असल्याचे उपअभियंता सुर्यवंशी यांनी दिलेल्या लेखी आश्‍वासनानंतर सतिष बोरुडे व टिळक भोस यांचे उपोषण स्थगित करण्यात आले. श्रीगोंदा तालुका व शहरामध्ये अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. तालुका व शहरातील व नागरिक व्यापारी त्रस्त झाले होते. याविषयी नागरिकांचा समस्या सातत्याने येत असल्यामुळे तसेच महावितरण कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांचे मनमानी कारभार, बदल्या किंवा अनेक महत्वाच्या रिक्त जागा असल्या मुळे विजेचा लपंडाव सुरू होता.
ऐन कडक उन्हाळा, 10 ते 12 तास लाईट जाणे नित्याचे झाले होते. याबाबत विशाल सकट हे ऑक्टोबर 2023 पासून पाठपुरावा करत होते. परंतु वरिष्ठ कार्यालयाशी पाठपुरावा करून देखील दुरुस्ती साहित्य मिळत नसल्याने आम्ही मेंटेनन्स ची कामे करू शकत नाही. असे श्रीगोंदा एस.डी.ओ.यांचे म्हनने होते. यावरून टिळक भोस व सतिष बोरुडे यांनी खांडेकर अधीक्षक अभियंता यांची अहमदनर येथे भेट घेतली. त्याबाबत लेखी तक्रार दाखल केली. तरीही या मेंटेनन्सची कामे होत नव्हती. कारण या कामांसाठी खाजगी एजन्सी नियुक्त नव्हती. तसेच बाह्यस्त्रोत कर्मचारी यांचे तीन महिनेपासून वेतन प्रलंबीत होते. या सर्व प्रश्‍नांवरून महावितरण कार्यालयात अनागोंदी कारभारामुळे नागरीक त्रस्त झाले होते. म्हणून आज तहसिल कार्यालय समोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. दुपार नंतर महावितरण चे अधिकारी यांनी 31 मे पूर्वी सर्व दुरुस्ती ची कामे करून श्रीगोंदा शहर व तालुक्यात पूर्ण दाबाने, व अखंडित वीजपुरवठा करण्यात येईल, असे लेखी पत्र आंदोलकांना दिल्या नंतर आंदोलनं स्थगित करण्यात आले. यावेळी विशाल सकट काकासाहेब कदम, नवनाथ दरेकर, मधुकर काळाणे, संदीप कुनगर, गणेश काळे, युवराज पळसकर, हुसेन खान, अल्ताफ शेख, वाल्मिक गायकवाड, सोमा गोडसे, आजिनाथ मोतेकर, आदी उपस्थित होते.

31 मे पूर्वी कामे न झाल्यास आणि विजेचा कायमस्वरूपी प्रश्‍न न सुटल्यास अधीक्षक अभियंता महावितरण यांचे कार्यालयात तीव्र आंदोलन करू. शासनाच्या सर्व विभाग अंतर्गत अनागोंदी कारभारामुळे जनता त्रस्त आहे. लोकहिताची व जनतेच्या तक्रारीसाठी सर्व विभागांची माहिती घेवून न्याय देण्याची भूमिका घेणार आहे. टिळक भोस, सतीश बोरुडे

COMMENTS