Homeताज्या बातम्यामनोरंजन

कॅन्सरशी लढाई जिंकल्यानंतर आता छवी मित्तल आली या आजाराच्या विळख्यात

मुंबई प्रतिनिधी - टीव्हीची सुप्रसिद्ध अभिनेत्री छवी मित्तल अनेकदा चर्चेत असते. गेल्या वर्षी तिने वैयक्तिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला ह

वनवास संपला! अय्यर सोडून बबिता ने जेठालालला मिठी मारली,
पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या अश्‍विनी पवार बिनविरोध
विषबाधा, भूतबाधा पेक्षा भयंकर अशी ‘गांधी बाधा’ यावर तोडगा म्हणजे छत्रपती

मुंबई प्रतिनिधी – टीव्हीची सुप्रसिद्ध अभिनेत्री छवी मित्तल अनेकदा चर्चेत असते. गेल्या वर्षी तिने वैयक्तिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. गेल्यावर्षी छवीने तिला स्तनाचा कर्करोग झाला असल्याचं सांगितलं होतं. तेव्हा तिच्या चाहत्यांनी तिच्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. छवीला कॅन्सर झाल्याचं उघड झाल्यापासून ती सोशल मीडियावर या ना त्या कारणाने चर्चा करत आहे. कॅन्सरशी लढा जिंकलेल्या छवी मित्तलला तिच्या फोटोंमुळे बऱ्याच दिवसांपासून ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. पण अभिनेत्री आज पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे कारण म्हणजे तिची तब्येत. आता कॅन्सर मधून बरं झाल्यानंतर छवी मित्तलने आपल्या नवीन आजाराचा खुलासा केला आहे. छवी मित्तल आता कॉस्टोकॉन्ड्रिटिस नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. सोशल मीडियावर तिच्या आजाराबाबत खुलासा करताना छवीने लिहिले की, ‘माझ्या छातीत दुखापत झाली आहे. मला हा आजार होण्यामागचं कारण कर्करोगाचे उपचार असू शकते किंवा ऑस्टियोपेनिया साठी मी घेतलेली इंजेक्शन असू शकतात. यामुळे नव्या आजारामुळे अभिनेत्रीला श्वास घेताना, हात उचलताना, झोपताना, हसताना वेदना होत आहेत.

छवी मित्तल यावेळीही या आजाराविरुद्ध धैर्याने लढत आहे. अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘नाही, मी याबद्दल नेहमीच सकारात्मक नसते. आयुष्यात एकदा आपण सगळे खाली पडतो, पण पुन्हा उठतो. मीही त्यातूनच जात आहे. तिची पोस्ट एका सकारात्मक नोटवर संपवत छवीने लिहिले की, ‘कोणीतरी हे ऐकायला हवे.. मला तुमच्या वेदना कोणत्या ना कोणत्या मार्गाने माहित आहेत.. पण तू एकटी नाहीस! आणि हे देखील पास होईल. आरोग्य हीच संपत्ती आहे.’ अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत

COMMENTS