श्रीहरीकोटा प्रतिनिधी - भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोची ( ISRO ) चांद्रयान ३ मोहीम सध्या चर्चेत आहे आणि त्याच्या अपडेटनुसार हे या
श्रीहरीकोटा प्रतिनिधी – भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोची ( ISRO ) चांद्रयान ३ मोहीम सध्या चर्चेत आहे आणि त्याच्या अपडेटनुसार हे यान चंद्रभोवती १५० ते १७७ किलोमीटर अशा वर्तुळाकार कक्षेत सध्या फिरत आहे. येत्या २३ ऑगस्टला हे यान चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. असं असतांना इस्रोची आणखी एक मोहीम जगाचे लक्ष वेघून घेणार आहे. ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रो Aditya L1 हे यान पाठवणार आहे. अर्थात हे यान सूर्याच्या जवळ जाणार नसून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावरुन सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणार आहे. या अंतरावरुन ते कुठलाही अडथळा ने येता अविरत पणे सूर्याचा अभ्यास करणार आहे. इस्रोच्या PSLV या अत्यंत भरवशाच्या प्रक्षेपकाद्वारे या यानाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. यानाचे वजन सुमारे एक हजार ४७५ किलो असून त्यावरील विविध सात वैज्ञानिक उपकरणांचे वजन हे २४४ किलो आहे. यानाचा कार्यकाल पाच वर्ष एवढा नियोजीत केला आहे. मोहीमेचा खर्च हा सुमारे ३८० कोटी एवढा आहे. गेली अनेक वर्षे सूर्याचा पृथ्वीवरुन विविध शक्तीशाले दुर्बिणींद्वारे अभ्यास केला जात आहे, अवकाशात पृथ्वीपासून काही अंतरावर तर सूर्याच्या भोवती यान पाठवतही सूर्याबद्दल अधिकाधिक माहिती गोळा केली जात आहे. आदित्य L1 वर सात विविध उरकरणे आहेत. याद्वारे सूर्यावरील विविध थरांचे वातावरण, वातावरणाच्या तापमानातील चढ-उतार, सूर्यापासून निघणारे उर्जाभारित कण, सूर्याभोवती असलेले चुंबकीय क्षेत्र, सुर्यावरील सौर वादळे यांचा अभ्यास केला जाणार आहे.
COMMENTS