Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील मेळाव्यानंतर बापटांची प्रकृती खालावली

पुणे/प्रतिनिधी ः कसबा मतदारसंघातील जागा वाचवण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली असतांनाच, महाविकास आघाडी, आणि त्यातच ब्राम्हण महासंघाने निवडणु

शेतकरी नागवला जातोय
आता कोणीही लॉकडाऊन अजिबात पाळणार नाहीत…
अभिनेता अक्षय कुमार च्या आगामी ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे नावात बदल | LOKNews24

पुणे/प्रतिनिधी ः कसबा मतदारसंघातील जागा वाचवण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली असतांनाच, महाविकास आघाडी, आणि त्यातच ब्राम्हण महासंघाने निवडणुकीत उडी घेतल्याने भाजप बॅकफूटवर गेली होती. त्यामुळे भाजपने आपला हुकमी एक्का खासदार गिरीश बापट यांना मैदानात उतरवले होते. मात्र गुरुवारच्या सभेनंतर बापटांची प्रकृती खालावली आहे.
कसबा मतदार संघातून सर्वाधिक काळ आमदार गिरीश बापट यांची प्रकृती खराब असल्याने ते पोटनिवडणुकीपासून दूर होते. तसे पत्रही त्यांनी दिले होते. दरम्यान ते नाराज असल्याचे वृत्त होते. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची भेट घेत त्यांना समजावल्याने अखेर त्यांनी प्रकृती ठीक नसतांनाही कसबा मतदार संघाच्या प्रचारात उडी घेत आपली पक्षनिष्ठा दाखवून दिली. मात्र, शुक्रवारी त्यांची प्रकृती पुन्हा खालवल्याने गिरीश बापट यांना तातडीने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यात सध्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कसबा निवडणुकीसाठी स्वत: देवेंद्र फडणीवस पुण्यात मुक्काम ठोकून आहेत. तसेच भाजपचे वरिष्ठ नेते मंडळी देखील पुण्यात तळ ठोकून आहेत. मात्र, कसब्याचे किंगमेकर गिरीश बापट हे या निवडणुकीपासून दूर राहणार होते. तसे पत्रही त्यांनी पक्ष प्रमुखांना दिले होते. दरम्यान ते नाराज असल्याची देखील चर्चा होती. यामुळे भाजपचे टेंशन वाढल्याने देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांनी त्यांची भेट घेत त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. नाकाला ऑक्सीजन नळी आणि थरथरत्या हातांनी त्यांनी व्हीलचेअर वरून येत गुरुवारी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारात रॅलीत ते सहभागी झाले होते. गिरीश बापट यांची प्रकृती खालावल्याने भाजपची चिंता वाढली आहे.

COMMENTS