Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिंधुदुर्ग, कोल्हापुरानंतर तिसऱ्या जिल्ह्यातही गौतमीला नो एन्ट्री!

सोलापूर प्रतिनिधी - 'सबसे कातिल गौतमी पाटील' च्या तालावर आज संपूर्ण महाराष्ट्र नाचत आहे. या गौतमी पाटीलबाबतच महत्वाची माहिती समोर आली आहे. को

गौतमी पाटील गावात येणार म्हणून सुट्टी हवी, एसटी चालकाचा अर्ज व्हायरल
अश्लीलतेची संस्कृती माजवणाऱ्या गौतमीला फडात नाचायला काय होते ?
गौतमी पाटीलची मुख्य भूमिका असलेला ‘घुंगरू’ या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली

सोलापूर प्रतिनिधी – ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ च्या तालावर आज संपूर्ण महाराष्ट्र नाचत आहे. या गौतमी पाटीलबाबतच महत्वाची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर सिंधुदुर्गपाठोपाठ आता सोलापूर पोलिसांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे गौतमीसह तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला वेगवेगळ्या शहारांमध्ये बंदी घालण्यात येत आहे. त्यामुळे तिचे चाहते नाराज होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरमध्ये गौतमी पाटील ‘डिस्को दांडिया’ कार्यक्रमाला हजेरी लावणार होती. पण सोलापूर पोलिसांनी गौतमी पाटीलच्या या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण सांगत सोलापुरातील विजापूरनाका पोलिसांनी या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे.

COMMENTS