Homeताज्या बातम्यादेश

पतीशी घटस्फोट घेत दोन तरुणींनी लग्नगाठ बांधली

पश्चिम बंगाल - पश्चिम बंगाल मध्ये एका मंदिरात दोन मुलींचं पारंपरिक पद्धतीने लग्न झालं. रविवारी मध्यरात्री भूतनाथ मंदिरात मौसमी दत्ता आणि

येवला नाका भागातील खड्डा देतोय अपघाताला निमंत्रण
जनतेचे कामे करणे हेच माझे कर्तव्य-एल.आर.वाजे
बंदूक लावून पळवून नेऊन लग्न व बलात्कार

पश्चिम बंगाल – पश्चिम बंगाल मध्ये एका मंदिरात दोन मुलींचं पारंपरिक पद्धतीने लग्न झालं. रविवारी मध्यरात्री भूतनाथ मंदिरात मौसमी दत्ता आणि मौमिता मजुमदार यांनी गुपचूप लग्न केल्याचं सांगितलं जात आहे पण नंतर त्यांनी ही बातमी सोशल मीडियावरून शेअर केली.  पश्चिम बंगालमध्ये 2 मुलींनी एकमेकींसोबत जगण्याची शपथ घेतली आणि साक्षीदार म्हणून भूतनाथसमोर लग्न केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मौसमी दत्ता आधीच विवाहित होती. तिला तिच्या पतीपासून 2 मुलंही आहेत. तिने मीडियाला सांगितलं की, तिचा नवरा तिला रोज मारहाण करत असे, त्यामुळे ती पतीपासून वेगळी झाली. दोन्ही तरुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आल्या. बऱ्याच दिवसांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता अडचण अशी होती, की मौसमीच्या मुलांचं काय होणार? त्यामुळे मौमिताने तिच्या मुलांना स्वेच्छेनं स्वीकारलं. प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, प्रेम फक्त स्त्री आणि पुरुष यांच्यातच असतं का? दोन स्त्रिया किंवा दोन पुरुष प्रेमाने एकत्र राहू शकत नाहीत का? असं सांगितलं जात आहे की मौमिताच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नव्हतं, त्यांनी तिला घरात येण्यास मनाई केली होती. पण तिने आयुष्यभर मौसमीला सोडणार नसल्याचं वचन दिलं होतं. त्यामुळे वचन पाळण्यासाठी ती आपल्या प्रेयसीसोबत भाड्याच्या घरात राहू लागली. परंपरा मोडत मौमिता आणि मौसमी यांनी एकमेकींचा हात धरला. मौमिता मजुमदार आणि मौसमी दत्ता यांनी देवाला साक्षी मानून बागदार, चिंगरीघाटा येथील भूतनाथ मंदिरासमोर लग्न केलं. असं सांगितलं जात आहे की, त्यांच्या प्रेमप्रकरणादरम्यान मौमिता मजुमदार काही दिवसांसाठी बाणगावहून कोलकाता येथे गेली होती. तेव्हा मौसमीला समजलं की ती तिच्याशिवाय राहू शकणार नाही. तिने सांगितलं की “जसं झाड पाण्याशिवाय जगू शकत नाही, तसं मी तिच्याशिवाय जगू शकत नाही.” म्हणून मी लगेचच लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि लग्न केलं.

COMMENTS