मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्या
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून राहूल नार्वेकर यांची निवड करावी, यासाठी प्रस्ताव मांडला. त्याला अनिल पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर राहुल नार्वेकर यांची आवाजी मतदानाने एकमताने विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. यापूर्वी ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदे हे 1962 आणि 1967 असे दोन वेळा अध्यक्ष झाले होते. सयाजी सिलम हेही दोन वेळा अध्यक्ष होते, पण त्यांचा एक कार्यकाळ हा संयुक्त महाराष्ट्र होण्याआधीचा होता. संयुक्त महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे 11 वेळा, राष्ट्रवादीकडे तीन वेळा, भाजपकडे दोन वेळा, तर शिवसेनेकडे एकवेळा राहिले आहे. आता भाजपला तिसर्यांदा हे पद मिळाले आहे.
COMMENTS