Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तब्बल 20 वर्षानंतर पुन्हा एकदा भरला चौथीचा वर्ग

कोपरगाव ः आई-वडिलांनंतर खर्‍या अर्थाने आयुष्याचा पाया भक्कम करणारे आपले दुसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक असतात. आणि अशा शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक

मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय राऊत
’माझी वसुंधरा’अंतर्गत चालता चालता कचरा उचलण्याची मोहीम
देवळाली प्रवरातील नगरपरिषद हद्दीतील नागरी समस्या सोडवा

कोपरगाव ः आई-वडिलांनंतर खर्‍या अर्थाने आयुष्याचा पाया भक्कम करणारे आपले दुसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक असतात. आणि अशा शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे आद्य कर्तव्य असतेत अशाच उदात्त भावनेतून नाटेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तब्बल वीस वर्षानंतर पुन्हा एकदा  चौथीचा वर्ग भरला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  म्हणून तत्कालीन  शिक्षक दांपत्य  प्रकाश जोशी व वैशाली जोशी  होत्या  शिवछत्रपतींच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून प्रार्थनेने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
पुन्हा एकदा चौथीचा वर्ग भरत असताना शिक्षक  प्रकाश जोशी यांनी  मुलांची हजेरी घेत जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला. सर्व मुला मुलींनी परिचय करून देत आपण सध्या कोणत्या क्षेत्रात अव्वल आहोत याची माहिती करून देत लाभलेल्या शिक्षकांना सुखाचे अनुभव दिले. उपस्थित असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपले मनोगत सादर करत असताना शाळेतील गमती जमती विनोद आठवणी या पुन्हा एकदा अनुभवायला सर्वांना भाग पाडले. पहिली ते तिसरी पर्यंत एकही शिक्षक न लाभलेल्या या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाश जोशी  आणि वैशाली जोशी यांचे आगमन झाले आणि सर्वांच्याच आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. प्रत्येकाने च या शिक्षक जोडीचे आभार आपल्या मनोगतातून व्यक्त केले. खर्‍या अर्थाने आयुष्याचा पाया भक्कम केला तो श्री व सौ.जोशी यांनी.प्राथमिक,माध्यमिक शाळेनंतर सर्वांनीच उच्च शिक्षण घेतले परंतु शाळेतील गोड आठवणी कोणीही विसरू शकलेले नाही.प्रत्येक जण बोलत असताना शिक्षकां प्रति कृतज्ञता व्यक्त करत होते. पुढे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना जोशी  म्हणाले की मुलांनो आयुष्यात पुढे जात आहे आम्हाला आनंद आहे आज प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. प्रत्येक जण लाईफ मध्ये सेटल आहे. परंतु तुमचा गुरु आणि शिक्षक या नात्याने एक गोष्ट सांगेन आणि ती तुम्ही नेहमी ध्यानात ठेवा की जीवनात कधीच कुठले वाईट गोष्टींचे व्यसन करू नका करायचे असल्यास चांगल्या विचारांचे करा चांगल्या सवयींचे करा. आजचे युग हे पैशावर चालणारे आहे परंतु पैसा व्यर्थ वाया घालवू नका. आमच्या आयुष्यात आमचे अनेक सत्कार समारंभ होतील परंतु आमच्या विद्यार्थ्यांनी केलेला आमचा सन्मान हा आमच्यासाठी कायम स्मरणीय असेल असं यावेळी जोशी  आपल्या मनोगतातून व्यक्त करत असताना सर्वांनाच गहिवरून आले. अगदी हसत खेळत पार पडत असलेल्या या माजी विद्यार्थी मेळाव्यास विठ्ठल मोरे, किरण मोरे, किरण वहाडणे, अमोल मोरे, प्रमोद मोरे, जनार्दन मोरे, राहुल भोरकडे, राहुल देवरे, राजेंद्र मोरे, गोकुळ मोरे,मनीषा मोरे, अनिता मोरे, आरती पगारे, रूपाली मोरे, जितेंद्र मोरे, भूषण वाणी, कैलास मोरे, प्रदीप वाघ, गणेश घोरपडे, लक्ष्मण मोरे, दीपक मोरे, समाधान कुर्हाडे,रामकिसन मोरे, आदी माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी मीना वर्पे-शिंदे हिने केले तर सचिन राजुडे या विद्यार्थ्याने आभार व्यक्त केले.

COMMENTS