Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अ‍ॅड. आंबेडकरांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा

कोपरगाव प्रतिनिधी ः अ‍ॅड. बाळासाहेब यांनी सर्व सवलतीसाठी वंचित घटकाना संघटित करून वंचितांना त्यांच्या हक्काची व कर्तव्याची जाणीव करून देऊन सत्तेच

राहुरीत खासदार विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
ग्रामीण रुग्णालय राहुरी शहरातच राहणार
साखर कारखाना विक्री घोटाळ्याचा खटला पारनेर न्यायालयात

कोपरगाव प्रतिनिधी ः अ‍ॅड. बाळासाहेब यांनी सर्व सवलतीसाठी वंचित घटकाना संघटित करून वंचितांना त्यांच्या हक्काची व कर्तव्याची जाणीव करून देऊन सत्तेच्या जवळ जाण्याची दिशा दाखवली. आशा बहुजन हृदय सम्राट अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचितांच्या वेदना जाणून घेऊन अतिशय तळमळीने वंचितांचे प्रश्‍न ऐरणीवर मांडून वंचितांना न्याय देण्यासाठी अहोरात्र झटत असणार्‍या आशा कर्तृत्वान नेतृत्वाचा 69 वा वाढदिवस कोपरगाव तालुका व शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडी उत्तर महाराष्ट्र संघटक शरद  खरात यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका व शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतिने कोपरगाव येथील  गोरक्षनाथ मंदिर  परिसरात असणार्‍या भिक्षेकरू आणि गरीब गरजूवंत महिला पुरुष व बालकांना गोडाचे अन्नदान करत  भिक्षेकरू यांच्या हस्ते केक कापून व फटाक्याच्या आतिषबाजीत अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक अनिल  बनसोडे, शहरअध्यक्ष विजय जाधव, शहर उपाध्यक्ष संजय कोपरे, तालुका महासचिव राजेंद्र मोकळ, महिला आघाडीच्या सुनिता मुंतोडे, प्रिया खरोटे, आरती वाघमारे, मुद्रा जाधव यांच्या सह कोपरगाव तालुका व शहर वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व ड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर श्रद्धा असणारे जीवन वाघमारे, नितीन बनसोडे, संजय लोंढे, विकास देशमुख,लकी आवारे, शकील तांबोळे,लक्ष्मण पगारे, प्रमोद पगारे, जगन्नाथ मोरे, पवनशेठ पंजाबी, दिगंबर आल्हाट, चित्तरंजन मोकळ,  सुनील वाहुळकर, दिपक पुडे, अनिल कारके, आकाश मोरे, आदित्य जाधव,रणजित खरात, बापु खरात,अश्‍विन खरात, शरद त्रिभुवन यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थित अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर  साहेबांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संघटक शरद खरात, नितीन बनसोडे, संजय लोंढे आदींनी ड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख करत साहेबांना 69 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी उपस्थितीताचे आभार अनिल बनसोडे यांनी मानले.

COMMENTS