Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अ‍ॅड. रश्मी कडू यांना अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार

कोपरगाव प्रतिनिधी ः जय मल्हार शिक्षणिक व बहुद्देशीय सामाजिक संस्था, अहमदनगर यांच्यातर्फै दिला जाणारा राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस

जागतिक आदिवासी दिन कल्याणमध्ये उत्साहात
गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश सुविधा केंद्र सुरु
आर.आर. माने यांना संत सेवा पुरस्कार प्रदान

कोपरगाव प्रतिनिधी ः जय मल्हार शिक्षणिक व बहुद्देशीय सामाजिक संस्था, अहमदनगर यांच्यातर्फै दिला जाणारा राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार या वर्षाकरीता अ‍ॅड. रश्मी मनोज कडू याना जाहिर झालेला आहे.
अ‍ॅड. रश्मी कडू या गेल्या सात वर्षापासून आपले सासरे अ‍ॅड. बाळासाहेब कडू व पती अ‍ॅड. मनोज कडू यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक व राजकीय कार्यात सक्रीय सहभागी आहे. तसेच प्रेरणा फाउंडेशन, जिजाऊ महिला मंडळ, लिनेस क्लब आदी संस्थांच्या मदतीने त्या वृक्षारोपण, अवयवदान विषयक मार्गदर्शन तसेच जनजागृती करणे, विविध आरोग्य विषयक शिबीर आयोजित करणे इ समाज उपयोगी प्रकल्प राबवत आहे. त्यांनी केलेले सामाजिक काम लक्षात घेऊन, पुरस्कार निवड समितीने त्यांचा नावाची निवड करून त्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार साठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. जय मल्हार शिक्षणिक व बहुद्देशीय सामाजिक संस्था अहमदनगर यांच्यातर्फै हा पुरस्कार दिला जातो. सन 2023 करीता हा पुरस्कार अ‍ॅड. कडू यांना जाहीर केलेला आहे. सदर पुरस्कार निवड़ी संबधीचे पत्र जय मल्हार शैक्षणिक व बहुद्देशीय सामाजिक संस्था अहमदनगरचे अध्यक्ष कांतीलाल जाडकर व सचिव निलम जाडकर यांनी दिले.

COMMENTS