सातारा / प्रतिनिधी : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांसाठी प्रतीक्षा यादीतील दुसर्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रियेसाठी 28 जून
सातारा / प्रतिनिधी : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांसाठी प्रतीक्षा यादीतील दुसर्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रियेसाठी 28 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. राखीव जागांमधील निवड यादीतील विद्यार्थ्यांची मुदत 11 मे रोजी संपली आहे. मात्र, सद्य:स्थितीत प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रिया सुरू असून आरटीईअंतर्गत आतापर्यंत एक हजार 483 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत मोफत प्रवेश दिला जातो. यामध्ये जिल्ह्यात 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी 227 शाळांची नोंदणी झाली आहे. त्यासाठी 3 हजार 261 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज आले आहेत. यामध्ये यंदा आरटीईअंतर्गत जिल्ह्यात 1 हजार 931 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामधील पहिल्या फेरीत 1701 विद्यार्थ्यांची निवड यादी लावण्यात आली होती. त्यातील शेवटच्या दिवसापर्यंत 1 हजार 79 जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे पहिल्या फेरीत चारशेहून अधिक जागा शिल्लक होत्या.
त्यानंतर प्रतीक्षा यादीतील पहिल्या टप्प्यातील प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर एकूण 286 प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. त्यामध्ये 118 प्रवेश झाल्याने आरटीईचे 1 हजार 483 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या आरटीअंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी 29 एप्रिल व पुन्हा 10 मेपर्यंत मुदतवाढ दिली होती. आता प्रतीक्षा यादीतील दुसर्या टप्प्यातील प्रवेशाची मुदत वाढविली आहे. विद्यार्थ्यांना तिसर्या टप्प्यात आणखी प्रवेश मिळणार असल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
COMMENTS