Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरटीईतून मान्यताप्राप्त शाळांनी प्रवेश देणे बंधनकारक : विनय गौडा

मोफत सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश देण्याबाबत बैठकसातारा / प्रतिनिधी : आरटीई प्रवेशास सातारा जिल्ह्यातील 227 शाळा पात्र असून, तीन शाळ

म्हसवडमध्ये श्री सिध्दनाथांचे अतिकडक असे उभ्या नवरात्राचे व्रत सुरु
शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 482 अंकानी घसरला तर निफ्टी 17,674 वर बंद
स्वाभिमानीने कराड-वाळवा तालुक्यातील साखर कारखान्यांची ऊस वाहतूक रोखली

मोफत सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश देण्याबाबत बैठक
सातारा / प्रतिनिधी : आरटीई प्रवेशास सातारा जिल्ह्यातील 227 शाळा पात्र असून, तीन शाळा वगळता सर्व शाळांनी आरटीई प्रवेश दिले आहेत. उर्वरित शाळांनी आरटीईनुसार प्रवेश देणे गरजेचे आहे. आरटीई प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवता येणार नसून प्रवेश देणे बंधनकारक आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, आरटीईचे प्रतिपूर्ती अनुदानाची बाब शासन स्तरावरील असून, शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यावर संबंधित शाळांना देण्यात येणार असल्याचे गौडा यांनी सांगितले.
मोफत शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25 टक्के प्रवेश विद्यार्थ्यांना नाकारणार्‍या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, युनिव्हर्सल नॉलेज सिटी व के. एस. डी. शानभाग इंग्लिश मीडियम स्कूल सातारा या तीन शाळांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नोटिसा काढल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर विनय गौडा, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, संबंधित शाळांचे संस्थापक, मुख्याध्यापकांची आज जिल्हा परिषदेत बैठक झाली. यावेळी गौडा म्हणाले, बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील नियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील मुलामुलींना 25 टक्के प्रवेश देणे बंधनकारक आहे. याबाबत शासनाने वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शाळांनी शासनाच्या धोरणानुसार प्रवेश देण्याची कार्यवाही केली आहे. काही शाळांमधील आरटीई प्रवेश पात्र विद्यार्थी जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आल्याची बाब निदर्शनास आली आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे.
दरम्यान, सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या शैक्षणिक वर्षातील आरटीई प्रतिपूर्ती झाली नाही. परिणामी यंदाच्या शैक्षणिक वर्षातील प्रवेश देता येणार नाहीत. शासनाकडून रकमेची प्रतिपूर्ती न झाल्याने शिक्षकांचे वेतन, शाळेच्या इतर सर्व बाबींचा खर्च करणे शक्य नसल्याचे संस्थापक व मुख्याध्यापकांनी यावेळी बैठकित सांगितले. याबाबत आरटीई प्रतिपूर्ती ही बाब शासन स्तरावरील आहे. शासनाकडून प्रतिपूर्ती प्राप्त झाल्यानंतर संबंधित शाळांना देण्यात येईल, असे गौडा यांनी सांगितले. दरम्यान, मुख्याध्यापक व संस्थापक यांनी आरटीई प्रवेशाबाबत एकत्रित विचार करून निर्णय घेण्याचे आश्‍वासन बैठकीत दिले.

COMMENTS