Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

2.15 कोटीच्या कामास प्रशासकीय मान्यता ः आ. आशुतोष काळे

कोपरगाव मतदारसंघातील विकास कामांना येणार वेग

कोपरगाव : कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी आजवर तीन हजार कोटीच्या वर निधी आणला असून मतदार संघातील विविध गावांच्या विकासासाठी पुन्हा एकदा विविध य

भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
साखर उद्योगाबाबत शाश्‍वत धोरणाची गरज ः आ. आशुतोष काळे
युवकांनी जिम साहित्याचा फायदा घेवून शरीर सुदृढ बनवावे 

कोपरगाव : कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी आजवर तीन हजार कोटीच्या वर निधी आणला असून मतदार संघातील विविध गावांच्या विकासासाठी पुन्हा एकदा विविध योजनेतून 2.15 कोटी निधीच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
यामध्ये नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान योजने अंतर्गत प्रत्येकी 25 लक्ष याप्रमाणे एकूण 75 लक्ष निधीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून मौजे सुरेगांव येथे बाजारपेठ विकास करणे तसेच गावांतर्गत रस्ता करणे व कोकमठाण येथे बाजारपेठ विकास करणे या कामांचा समावेश आहे. जनसुविधा विशेष अनुदान योजने अंतर्गत विविध गावांसाठी 1 कोटी निधीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये मौजे वडगाव, बक्तरपुर, काकडी, माहेगाव देशमुख, चांदगव्हाण, आपेगाव या गावातील स्मशानभूमी विकास करणे प्रत्येकी (10 लक्ष) एकूण 60 लक्ष, तसेच धोंडेवाडी येथे गावांतर्गत रस्ता करणे (10 लक्ष), कोकमठाण येथे समाज मंदिर ते अमोल खांडगे घर रस्ता करणे (10 लक्ष), खोपडी येथे गावांतर्गत रस्ता करणे (10 लक्ष), शिंगणापूर येथे गावांतर्गत रस्ता करणे (10 लक्ष) आदी कामांचा समवेश आहे. ग्रामीण तीर्थक्षेत्र विकासासाठी ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत एकूण 40 लक्ष निधीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये श्री अमृतेश्‍वर महादेव मंदिर, माहेगांव देशमुख परिसर सुशोभिकरण करणे (10लक्ष), कोळपेवाडी येथील श्री महेश्‍वर मंदिर, परिसर सुशोभिकरण करणे (10लक्ष), कोकमठाण येथील श्री लक्ष्मी माता मंदिर देवस्थान परिसर सुशोभिकरण करणे (10लक्ष) व पोहेगांव येथील श्री क्षेत्र मयुरेश्‍वर गणेश मंदिर परिसर सुशोभिकरण करणे (10लक्ष) या कामांचा समावेश आहे. मतदार संघातील प्रत्येक गावात विकास पोहोचला असून त्यामुळे नागरिकांना विकासाच्या बाबतीत येणार्‍या बहुतांश अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून मतदार संघाच्या विकासासाठी अधिक निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

COMMENTS