मुंबई ः ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या रेमडेसिव्हिर घोटाळ्यात अडचणी वाढतांना दिसून येत आहे. कोविड काळामध्ये दिलेले टेंडर आणि इतर प्रकरणाची
मुंबई ः ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या रेमडेसिव्हिर घोटाळ्यात अडचणी वाढतांना दिसून येत आहे. कोविड काळामध्ये दिलेले टेंडर आणि इतर प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक शाखेकडून करण्यात येत आहे. तब्बल 5 कोटी 96 लाख रूपयांच्या रेमडेसिव्हिर खरेदी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय पुण्यशील पारेख यांची चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ठाकरे परिवाराला घेरण्याची तयारी सरकारने सुरु केल्याचे दिसून येत आहे.
पुण्य पारेख यांची तब्बल सात तास त्यांची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. या चौकशीत त्यांना रेमडेसिव्हिर कंत्राटाबाबत प्रश्न विचारण्यात आले. यामुळे युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणीतही वाढ होण्याची शक्यता आहे. कोव्हिड काळात आदित्य ठाकरे यांच्या सामाजिक कार्याच्या टीममध्ये पारेख याचा सहभाग होता. यासंदर्भात मायलॅन कंपनी सोबत कंत्राटाची चर्चा होत असताना पारेख त्या बैठकीला उपस्थित होते. महापौर बंगल्यावर झालेल्या या बैठकीत पारेख का उपस्थित होते? या टेंडरचा त्यांच्याशी काय संबंध आहे, मुंबई मनपाच्या आरोग्य अधिकार्यांनी रेमडेसिव्हिर बाबात त्यांचा सल्ला घेतला का? याबाबत चौकशी झाली. व्यवसायने चार्टड अकाउंटट असलेल्या पारेख यांना या प्रकरणाचा कोणताही लाभ झाला का? याबाबतची चौकशी झाल्याची माहिती आहे.
COMMENTS