Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारवी धरणाकरिता अतिरिक्त जमिन संपादित करून शेतकऱ्यांना मोबदला देणार : मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. १९ : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील बारवी धरणासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आलेली आहे. या धरणात बुडीत होत असलेली अतिरिक्त 61 ह

विद्यार्थ्यांनो, पुस्तके वाचा, स्वतःला सक्षम बनवा : उपमुख्यमंत्री अजित पवार
स्वीस महिला अभ्यास मंडळाची ‘ ध्रुव’ भेट ; सर्जनशील अभ्यास पद्धतीचे कौतुक
निळवंडेचे पाणी पेटले; “आम्हालाही सहआरोपी करा” – शेतकऱ्यांची मागणी

मुंबई, दि. १९ : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील बारवी धरणासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आलेली आहे. या धरणात बुडीत होत असलेली अतिरिक्त 61 हेक्टर जमिन संपादित करण्यात येऊन बाधित शेतकऱ्यांना तातडीने मोबदला देण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत सांगितले. बारवी धरणातील संपादित जमिनी बाबत सदस्य किसान कथोरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना उद्योगमंत्री सामंत म्हणाले, बारवी धरणाच्या टप्पा क्रमांक एक आणि टप्पा क्रमांक दोन मधील 203 प्रकल्प बाधितांना सेवेत सामावून घेण्यासाठी एमआयडीसी तसेच महानगरपालिकांमध्ये प्रयत्न केले जातील. या प्रकल्पातील १२०४ पैकी ५७८ प्रकल्पबाधितांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाणी वापराच्या समन्वय तत्वावर सामावून घेतले आहे.

COMMENTS