Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वारकर्‍यांवर काळाचा घाला ; अपघातात 5 जणांचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील घटना अनेक वारकरी जखमी

मुंबई : राज्यात आषाढी एकादशीचा उत्साह असतांना आणि लाखो वारकरी आपल्या विठूरायांच्या दर्शनाची ओढ लागलेली असतांना मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मध्यरात्र

भाविकाचा अपघातात मृत्यू; पाच जण जखमी
सोलापुर-पुणे महामार्गावर भिषण अपघात ः 4 ठार
घराची पडवी अंगावर कोसळून माजी सरपंच महिलेचा दुर्दैवी मृत्यू .

मुंबई : राज्यात आषाढी एकादशीचा उत्साह असतांना आणि लाखो वारकरी आपल्या विठूरायांच्या दर्शनाची ओढ लागलेली असतांना मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मध्यरात्री 1 च्या सुमारास वारकर्‍यांच्या ट्रॅव्हल्सला झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर बरेच वारकरी जखमी असल्याचे समोर आले आहे.
डोंबिवली येथून पंढरपूरला जाणार्‍या वारकर्‍यांची ट्रॅव्हलबस ट्रॅक्टरला जोरदार धडकली असून या भीषण अपघात पाच जण ठार झाले आहेत. तर काही जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहेत. जखमींना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले आहेत. अपघातातील मृतांची नावे अद्याप समजू शकली नाही. मिळालेल्या माहितीनुसार आषाढी वारी निमित्त डोंबिवली येथून काही वारकरी हे एका ट्रॅव्हल बसने पंढरपूरला निघाले होते. या बसमध्ये 54 प्रवासी होते. गाडीत विठ्ठलाच्या नामघोषात सुरू होता. मात्र, अचानक एक ट्रॅक्टर वारकर्‍यांच्या ट्रॅव्हल बसला धडकला. हा अपघात ऐवढा भीषण होता की यात पाच जण जागीच ठार झाले तर 20 ते 25 जण जखमी झले आहेत. यातील काही जणांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती आहे. डोंबिबली येथून एका वारकर्‍यांच्या समूह हा पंढरपूरला ट्रॅव्हल्सने जात होते. गाडीत 54 वारकरी प्रवास करत होते. रात्री सर्व जण निघाले होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांची ट्रॅव्हल्स ही मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन पंढरपूरला जात होती. यावेळी ट्रॅव्हल्ससमोर एक ट्रॅक्टर भरधाव वेगात जात होता. या ट्रॅव्हल्स वरील चालकाचा ताबा अचानक सुटल्याने ट्रॅव्हल्स ही ट्रॅक्टरला जाऊन धडकली. व रस्त्याखाली थेट 30 ते 40 फूट खड्ड्यात जाऊन पडली. या अपघातात 5 जण ठार झाले तर 20 ते 25 जण जखमी झले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने बचावकार्य राबावत जखमी नागरिकांना जवळील एमजीएम रूग्णालय तसेच पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

COMMENTS