Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंना सातारा पोलिस ताब्यात घेण्याच्या तयारीत

सातारा / प्रतिनिधी : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात जुना गुन्हा दाखल असल्याने याप्रकरणी पोलिसांनी त्यांना मुंबईतून ताब

भामटे येथे तळ्यात बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू
काळामवाडी येथे तीन घरे आगीत जळून खाक; अंदाजे 15 लाखाचे नुकसान
मंगळवारी ना. शंभूराज देसाई यांचा जनता दरबार

सातारा / प्रतिनिधी : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात जुना गुन्हा दाखल असल्याने याप्रकरणी पोलिसांनी त्यांना मुंबईतून ताब्यात घेण्यासाठी तळ ठोकून आहेत. सातारा पोलिसांनी सकाळपासून फिल्डिंग लावली आहे. मात्र, मुंबईतील न्यायालय काय निर्णय देणार त्यावर पुढील बाबी अवलंबून आहेत. दरम्यान, खा. शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्लाप्रकरणी सध्या सदावर्ते यांचा ताबा मुंबई पोलिसांकडे आहे.
दोन वर्षांपूर्वी सातार्‍यातील फलटण तालुक्यात एक गुन्हा दाखल असल्याची खात्रीशीर माहिती आहे. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल असून मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने एका वृत्तवाहिनीवर त्यांनी बेताल वक्तव्य केले होते. समाजिक तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य झाल्याने याप्रकरणी राजेंद्र बाबुराव निकम (रा. तारळे, ता. पाटण) या तक्रारदाराने सातारा शहर पोलीस तक्रार दिली होती.
‘सिल्व्हर ओक’ हल्लाप्रकरणी दोन दिवस पोलीस कोठडीत असलेले एसटी कामगारांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी आज संपत असल्याने कोर्टात आणण्यात आले आहे. मात्र, आता नवा ट्विस्ट आला आहे. सातारा पोलीस कोर्टात दाखल झाले असून फलटण येथील एका प्रकरणात सदावर्ते यांचा ते ताबा मागण्याची शक्यता आहे. सदावर्ते यांच्या विरोधातील राज्यभरातील प्रकरणे तपासली जाणार असल्याचेही समजते.
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टाकडे सदावर्ते यांची पोलीस कोठडी वाढवून मागितली आहे. या घटनेतील चार आरोपी अजूनही ताब्यात आलेले नाही. त्यांना ताब्यात घ्यायचे आहे. तसेच आरोपीला जे फोन आले होते. त्याची माहिती आरोपी देत नाहीत, ते कोणत्याही प्रकारची माहिती देत नसल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. हल्ल्याच्या दिवशी सदावर्ते यांना कॉल आला होता, त्याची माहिती घ्यायची आहे. तेंव्हा पोलीस कोठडी वाढवून द्या, असे सरकारी वकिलांनी सांगितले आहे. सातार्‍यात वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात मराठा आरक्षणा संदर्भातील एक गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी त्यांची पोलीस कोठडी सातारा पोलिसांकडून मागण्यात येण्याची शक्यता आहे.

COMMENTS