शिर्डी प्रतिनिधी ः राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक हा स्वच्छता दूत म्हणून ओळखला जातो. या स्वयंसेवकांनी दत्तक गावात नियमितपणे स्वच्छता अभियान राब
शिर्डी प्रतिनिधी ः राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक हा स्वच्छता दूत म्हणून ओळखला जातो. या स्वयंसेवकांनी दत्तक गावात नियमितपणे स्वच्छता अभियान राबवावे, ग्रामस्थांना सोबत घेऊन आदर्शगाव निर्मिती करावी असे आवाहन गणेश सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ पाटील यांनी केले . ते शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूटचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व युवकांचा ध्यास ग्राम: शहर विकास या उपक्रमाअंतर्गत मौजे एकरुखे ता. राहाता येथे संस्थेचे डायरेक्टर डॉ.महेश खर्डे व प्राचार्य प्रो.डॉ सोमनाथ घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी शिबिर समारोप समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
संस्थेचे डायरेक्टर डॉ.महेश खर्डे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक हा वेळेला महत्त्व देतो.आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना त्यांच्या मनात असते त्यातूनच समाज कार्य घडले जाते. पुढील कालावधीत एकरुखे गावात नियमित सामाजिक उपक्रम व स्वच्छता अभियान राबवू. यावेळी गणेश सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पा. जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाधिकारी डॉ. सत्यजित पोतदार यांनी अहवाल वाचन केले. शिबिरात 125 स्वयंसेवक सहभागी झाले होते. कु.मयुरी पाचरणे, कु. वैष्णवी सांबारे, रविन चव्हाण व हम्जाह शहा या विद्यार्थ्यांची आदर्श स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रो.डॉ.सोमनाथ घोलप यांनी केले. याप्रसंगी सरपंच जितेंद्र गाढवे, उपसरपंच जगन्नाथ सोनवणे रामभाऊ सातव भरत काहकडे , भाऊसाहेब गाढवे, रामराव गाढवे, दगडू पाटील गाढवे, काशिनाथ गाढवे, साहेबराव आग्रे, पत्रकार चंद्रकांत आंग्रे शिर्डी साई रूरल इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ.महेश खर्डे, प्राचार्य डॉ सोमनाथ घोलप, उपप्राचार्य प्रा.संजय लहारे, डॉ.सुरेश पुलाटे, प्रा.टि.के.कुमकर,डॉ दादासाहेब डांगे, डॉ.विष्णू पावडे प्रा शुभांगी जगताप, प्रा. प्रियांका पेंडभाजे प्रा.प्रणाली बोठे, डॉ. बाबासाहेब सालालकर प्रा. चंद्रकांत बनसोडे प्रा संदीप तळवले,डॉ.गोपीनाथ शिरोळे डॉ.विक्रम भालेकर डॉ.अर्चना अत्रे. प्रा.रूपाली देसाई, प्रा. राहुल नरोडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रोहिणी कासार यांनी केले तर आभार डॉ. राजाराम वाकचौरे यांनी मानले.
COMMENTS