अदानींचे प्रसारमाध्यमे समुहात दमदार पाऊलानिमित्त!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

अदानींचे प्रसारमाध्यमे समुहात दमदार पाऊलानिमित्त!

अदानी उद्योग समुहाने देशातील खाजगी क्षेत्रात असलेले प्रमुख न्यूज चॅनल खरेदी केले आहे. त्यानिमित्त त्यांचा अलिकडच्या काळातील एक प्रागतिक आलेख घेणं महत

साहित्याचे नोबेल : अध्यात्म आणि भूक! 
जनमताचा कौल अनाकलनीय ! 
सीएम केअर फंडाचा अभिमानच! पीएम केअर चे काय…?

अदानी उद्योग समुहाने देशातील खाजगी क्षेत्रात असलेले प्रमुख न्यूज चॅनल खरेदी केले आहे. त्यानिमित्त त्यांचा अलिकडच्या काळातील एक प्रागतिक आलेख घेणं महत्वाचं आहे. सन २०१४ यावर्षापूर्वी आणि नंतर देशात दोन महत्वपूर्ण बदल दिसले ते म्हणजे २०१४ पूर्वी फक्त अंबानी हे जागतिक श्रीमंतांच्या यादीत वरखाली होत असत; तर त्यानंतर अदानी हे केवळ या स्पर्धेत आले नाही तर अंबानींना त्यांनी श्रीमंतांच्या यादीत ओव्हरटेक केले. आता अंबानी हे तर पहिल्या दहा श्रीमंतांच्या यादीतून बाहेर झाले, तर अदानींचे स्थान दोन अंकांनी घसरून सात वर आले. त्याचवेळी जगाला ज्या डिजिटल चलनाने भुरळ घातली होती आणि काही सरकारे देखील त्या प्रभावात आली होती, त्या बिटकाॅइनसह सर्व डिजिटल चलनांचे मुल्य प्रचंड वेगाने कोसळते आहे. या दोन्ही बाबींचा आपण तुलनात्मक विचार केला तर कल्पनेतून वास्तवाकडे जग मार्गक्रमण करेल याची जाणीव यातून होऊ लागली आहे. नव्वदीच्या दशकात अमेरिकेचे विख्यात व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ ली आयकाको यांनी अमेरिकन भांडवलदारांची खुशामत करताना म्हटले होते की, कोणत्याही देशांतील उद्योजक त्या देशातील कायदे पाळून पुढे जात असेल तर चांगली गोष्ट असते. अमेरिकन भांडवलदार कायद्याचे आटोकाट पालन करतात असे त्यांचे म्हणणे होते आणि त्यामुळेच जगातील कोणत्याही उद्योगजकांपेक्षा अमेरिकन उद्योजक सरस असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यावेळी देशात रिलायन्स समुह देशात उभारी घेत होता तो धीरूभाई अंबानी यांच्या नेतृत्वाखाली. रिलायन्स समुह मोठा झाल्याबरोबर त्यांनी पहीली मागणी केली ती म्हणजे लायसन्स राज हटाव. राजकीय हस्तकांना मध्यस्थी ठेवून रिलायन्स ने सरकारच्या अनेक उद्योगात शिरकाव करित आपली मालकी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आज संपूर्ण खाजगीकरण केल्या जाणाऱ्या सार्वजनिक उद्योग जे नवरत्न म्हणून ओळखले जातात त्यात रिलायन्स ने जवळपास पंचवीस वर्षांपूर्वी शिरकाव केला. एचपीसीएल, ओएनजीसी यात त्यांनी भाग मिळविण्यात तेव्हाच यश मिळवले होते. अदानी हे देखील याच प्रकारच्या क्लृप्त्या वापरत, परंतु, मध्यस्थ वापरण्यात रिलायन्स वाकबगार. सुरूवातीला सरकारी अधिकाऱ्यांना घेऊन सार्वजनिक उद्योगात घुसलेले हे उद्योग आता राजकी सत्ताच प्रत्यक्षाप्रत्यक्ष आपल्या हातातच असावी यासाठी सरसावली. त्याचा परिणाम २०१४ चा सत्ताबदलाकडे पाहिले पाहिजे. काॅंग्रेसची सत्ता असताना गुजरातच्या एका दिवंगत काॅंग्रेस नेत्याच्या माध्यमातून जमवून घेतलेल्या रिलायन्सने २०१४ मध्ये त्याच काॅंग्रेसला पटकी देत २०१४ च्या निवडणुकीसाठी आपला खजिना मोदींच्या बाजूने खुला केला. त्याचा परिणाम मोदींची प्रतिमा बनवून त्यांना सत्तेत आणण्यात यश मिळाले. त्यादरम्यान अदानी यांचाही उद्योजक म्हणून भारतीयांना ओळख झाली. २०१४ पासून हे दोन्ही उद्योजक जागतिक श्रीमंतांच्या यादीत वरच्या स्थानावर होते. पण गेल्या काही दिवसांपासून यांच्या श्रीमंतीत घसरण होत आहे. या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे भाग बाजारात यांच्या कंपन्यांचे शेअर्स किंवा भाग यांच्या किमती प्रचंड प्रमाणात घसरत आहेत. शेअर्सवर फुगलेली श्रीमंती शेअर्स कोसळताच ताळ्यावर येते. या घसरणीमुळे अंबानी दीर्घकाळानंतर पहिल्या दहामधून बाहेर झाले. तर अदानी पाचव्यावरून थेट सातव्या स्थानावर घसरले. जगातील पहिले चारही भांडवलदा हे आधुनिक उद्योगातून पुढे आले आहेत. म्हणजे आयटी सेक्टर किंवा गुंतवणूक. परंतु, अंबानी – अदानी हे पारंपारिक व्यवसाय करीत असून त्यातून त्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली. त्यातच या दोन्ही उद्योजकांनी डिजिटल चलन क्षेत्रात प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. सध्या डिजिटल चलनांची प्रचंड घसरण झाल्याने या क्षेत्राला त्याची जागा एकप्रकारे जग दाखवून देत आहे! आगामी काळ हा भांडवली प्रभावाचा असला तरी ज्या युरोप – अमेरिकेत कल्याणकारी भांडवलशाही त्याचा भारतात लवलेशही दिसत नाही! त्यामुळे, जगातील आणि खासकरून युरोप-अमेरिकन भांडवलदारांना लोकांच्या कल्याणाचे ध्येय बाळगणारी व्यवस्था शाबूत ठेवायची आहे. त्यामुळे, भारतीय भांडवलदारांना जागतिक पातळीवर आता खरी स्पर्धा करावी लागेल, असे दिसते! अदानी समुह यशस्वीतेच्या पायऱ्या पार करित आता प्रसार माध्यमांच्या क्षेत्रांतही दाखल झाल्याने त्यांचे अभिनंदन.

COMMENTS