बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा तिचा पती जीन गुडइनफ आणि मुले जय आणि जियासोबत शिमल्यात आहे. प्रीती सध्या तिच्या कुटुंबासोबत माहेरी वेळ घालवत आहे. त

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा तिचा पती जीन गुडइनफ आणि मुले जय आणि जियासोबत शिमल्यात आहे. प्रीती सध्या तिच्या कुटुंबासोबत माहेरी वेळ घालवत आहे. तिने नुकतीच तिच्या शिमल्यातील घराचे काही फोटो पोस्ट केले ज्यात ती तिथे शिमल्याच्या पहाडींमध्ये वापरल्या जाणार्या पारंपारिक चुलीवर जेवण शिजवण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. यातून ती पुन्हा आपलं माहेरपण अनुभवताना दिसतेय. फोटोमध्ये प्रीती सलवार सूटमध्ये दिसत आहे. तिने स्वेटरही घातला असून स्कार्फने डोकं झाकलं आहे. फोटोंमध्ये ती चुलीजवळ आग पेटवण्याचा आणि जेवण बनवताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना प्रितीने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘जुन्या आठवणींना उजाळा द्या आणि नवीन आठवणी बनवा. आमच्या पहाडी घरांमध्ये स्वयंपाकघरात सर्व कामं करत आहेत. इथे मी आग पेटवण्याचा आणि जुना स्टोव्ह वापरण्याचा प्रयत्न करत आहे.’ फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी तिच्या साधेपणावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, ‘हे अगदी खरं आहे मॅडम, डोंगरावरील घरांमध्ये स्वयंपाकघरात सर्व काही केलं जातं, तुम्हाला असं पाहून खूप आनंद झाला. तुम्ही जगात कुठेही जा मॅडम. यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटतो. एकाने लिहिलं, ‘हे खूप सुंदर आहे, सोनेरी वर्षांच्या सोनेरी आठवणी परत आल्या. त्यातले काही दिवस मी स्वतः जगत होतो. यासोबतच प्रितीने तिच्या कुटुंबासोबत हाटेश्वरी देवीच्या मंदिराला देखील भेट दिली. या मंदीरात ती मुलांच्या हातून अभिषेक करताना दिसत आहे. ती अतिशय आनंदी दिसत आहे. तिचे हे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
COMMENTS