Homeताज्या बातम्यामनोरंजन

अभिनेत्री नुसरत भरु सुखरूप भारतात परतली

मुंबई प्रतिनिधी - इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये शनिवारपासून युद्ध सुरू आहे. बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा या दोन्ही देशांमधील युद्धात इस्रायलमध्

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यक्षम ज्येष्ठ नागरिक संघ पुरस्कार व मनोरंजन कार्यक्रम
कोरोनामुक्त गावांतील 8 वी ते 12 वीच्या शाळा सुरू होणार : छगन भुजबळ
कर्नाटक सरकारचा आडमुठेपणा कायम

मुंबई प्रतिनिधी – इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये शनिवारपासून युद्ध सुरू आहे. बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा या दोन्ही देशांमधील युद्धात इस्रायलमध्ये अडकली होती. ही बातमी समोर आल्यानंतर नुसरतचे चाहते चिंतेत पडले होते आणि तिने सुखरूप मायदेशी परतण्यासाठी प्रार्थना करत होते. पण आता नुसरतबद्दल एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

युद्धात इस्रायलमध्ये अडकलेली नुसरत आता सुखरूप आपल्या देशात परतली आहे. मुंबई विमानतळावरून बाहेर पडलेल्या नुसरतची पहिली झलक समोर आली आहे. नुसरत पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र, ती खूपच नर्व्हस दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती.इस्रायलमध्ये सुरू झालेल्या युद्धात नुसरतशी संपर्क तुटला होता. सगळ्यांना तिची काळजी वाटत होती. त्यानंतर अनेक प्रयत्नांनंतर त्यांच्या टीमला नुसरतशी संपर्क साधण्यात यश आले. नुसरत भरुचाच्या टीमने सांगितले होते की अखेर आम्ही नुसरत भरुचा यांच्याशी संपर्क साधला आहे. दूतावासाच्या मदतीने तिला भारतात सुखरूप परत आणले जात आहे. ती सुरक्षित असून भारतात परतली आहे.

COMMENTS