Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभिनेत्री क्षिती जोगचे फेसबुक पेज हॅक

मुंबई प्रतिनिधी - मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग ही आपल्या हटके अभियासाठी ओळखली जातेच. तिनं मराठीसह हिंदीतही काम केलेलं आहे. यावेळी या चित्रपटात

वेळेवर बस सोडा; विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतसमोर ठिय्या
Solapur : भेसळयुक्त दुधाच्या साठ्यावर अन्न सुरक्षाची कारवाई
भाजपकडून सुडाचं राजकारण : मुख्यमंत्री ठाकरे | DAINIK LOKMNTHAN

मुंबई प्रतिनिधी – मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग ही आपल्या हटके अभियासाठी ओळखली जातेच. तिनं मराठीसह हिंदीतही काम केलेलं आहे. यावेळी या चित्रपटातूनही अभिनेत्री क्षिती जोगच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आलं आहे. रंधावा कुटुंबियांतील क्षिती एक आहे. त्याचसोबत यावेळी याच कुटुंबियातील एक मेंबरनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. तिचं वक्तव्यही चर्चेत आहे. अभिनेत्री क्षिती जोग ही मराठीची आघाडी अभिनेत्री आहे. अभिनेत्रीसोबतच ती एक सिने निर्मातीदेखील आहे. क्षिती नेहमीच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आतापर्यंत ही अभिनेत्रीने एका पेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. झिम्मा सिनेमाची ती निर्मातीही आहे. आता पुन्हा क्षिती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. याच कारण म्हणजे, क्षितीच्या फेसबुक अकांऊन्टवरुन काही अश्लिल व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.  सध्या सोशल  मीडियावर हेमंतची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे या संपुर्ण प्रकरणात पुढे काय होतंय. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नुकतीच अभिनेत्री रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये झळकली आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. 28 जूलै रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केलेली आहे. करण जोहरनं या चित्रपटाच्या यशानिमित्त खास पार्टीचेही आयोजन केलेले होते. त्यामुळे त्याचीही विशेष चर्चा रंगलेली होती. या चित्रपटातील सर्वच पात्र ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. सोबतच त्यांच्या अभिनयाचीही चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. या सगळ्या संदर्भातील माहिती क्षितीचा नवरा हेमंत ढोमेने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

COMMENTS