Homeताज्या बातम्यामनोरंजन

खतरों के खिलाडी 13′ मध्ये कुत्र्याचा हल्लाने अभिनेत्री जखमी

दिग्दर्शक रोहित शेट्टी होस्ट करत असलेला स्टंटवर आधारित खतरों के खिलाडी 13 मध्ये या रिअॅलिटी शोमध्ये टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा  जखमी झाली आह

चंद्रकांत खैरे नेहमी मला डावलण्याचा प्रयत्न करतात – अंबादास दानवे
शेतकर्‍यांच्या हिताची संपुर्ण माहिती त्यांना मिळावी-शरद झाडके  
सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश

दिग्दर्शक रोहित शेट्टी होस्ट करत असलेला स्टंटवर आधारित खतरों के खिलाडी 13 मध्ये या रिअॅलिटी शोमध्ये टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा  जखमी झाली आहे. ऐश्वर्या शर्मा ही ‘खतरों के खिलाडी 13′ मधील एक मजबूत स्पर्धक आहे. तिने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिच्या हातावर अनेक जखमा आहेत. तिचा हात पुर्णपणे निळा पडला आहे. ऐश्वर्या शर्माची ही अवस्था कोणी केली आहे याचं उत्तरही तिने या पोस्टमध्ये दिलं आहे. खतरों के खिलाडी 13’ चा एक प्रोमो नुकताच रिलीज झाला. यामध्ये ऐश्वर्या शर्माने सेफ्टी सूट परिधान केलेला आहे. त्यात ती पुढे पळत आहे तर तिच्यामागे एक कुत्रा पळतांना दिसतो. तो तिच्यावर हल्ला करतो. हा एपिसोड जो 26 ऑगस्टला दाखवला जाईल. ऐश्वर्याने तिचे काही फोटो शेअर केले.ऐश्वर्या शर्माने तिचे 6 फोटोंचा कोलाज शेयर केला आहे ज्यात तिच्या दोन्ही हात निळे पडले आहेत. त्याचबरोबर तिने . कुत्र्यांच्या फोटोही शेयर केला आहे. हल्ल्यामुळे हा प्रकार घडला. तिने त्याला आर्टिस्ट म्हटंल आहे. तर कॅप्शनमध्ये लिहिले, डॉग्गो, इतके सुंदर पेंटिंग बनवल्याबद्दल धन्यवाद. तिची पोस्ट सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. अनेकांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत तिच्या तब्येतीची विचारणा केली आहे तर तिच्या नवऱ्याने देखील, ‘तु तर सर्वांनाच आवडते ऐश्वर्या शर्मा’ अशी मजेशीर कमेंट केली आहे.

COMMENTS