Homeताज्या बातम्यामनोरंजन

अभिनेत्री ईशा देओल आणि भरत तख्तानी लग्नाच्या 11 वर्षांनी झाले वेगळे

मुंबई प्रतिनिधी - बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र व अभिनेत्री हेमा मालिनी यांची लेक ईशा देओलबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ईशा व तिचा

सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन
ओडिशात मालगाडी रेल्वे रुळावरून घसरली
राजस्थानमध्ये अपघातात 5 पोलिसांचा मृत्यू

मुंबई प्रतिनिधी – बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र व अभिनेत्री हेमा मालिनी यांची लेक ईशा देओलबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ईशा व तिचा पती व्यावसायिक भरत तख्तानी ११ वर्षांच्या संसारानंतर आता विभक्त झाले आहेत. ईशा आणि भरत यांच्या टीमकडून निवेदन देण्यात आलं आहे. “आम्ही परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या जीवनात होणारे बदल आणि आमच्या दोन मुलांच्या भवितव्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या आनंदाचा व हिताचा आम्ही नेहमीच विचार करू. आमच्या प्रायव्हसीचा कृपया आदर करा.” असं या निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे.

दरम्यान, ईशा देओलने २९ जून २०१२ रोजी भरत तख्तानीशी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं होतं. दोघांचं लग्न इस्कॉन मंदिरात पार पडलं होतं. लग्नाच्या पाच वर्षानंतर या अभिनेत्रीने तिच्या पहिल्या अपत्याला म्हणजेच राध्याला जन्म दिला. त्यानंतर २०१९ मध्ये ईशाला दुसरी मुलगी झाली. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी निर्माण झाल्याच्या बातम्या याआधी अनेकदा आल्या होत्या. सोशल मीडियावर तिने पतीसह फोटो शेअर करणंही थांबवलं होतं.

COMMENTS