Homeताज्या बातम्यादेश

अभिनेत्री अमाला पॉलला नाकारला केरळमधील मंदिरात प्रवेश

मंदिरात केवळ हिंदूनाच प्रवेश असल्याचा मंदिर प्रशासनाने दिला दाखला

एर्नाकुलम/वृत्तसंस्था ः अल्पावधीतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी प्रसिद्ध अभिनेत्री अमाला पॉल हिला एका वाईट अनुभवाल

महिला सक्षमीकरणाच्या योजनांतून महिलांनी आर्थिक उन्नती साधावी : पालकमंत्री दादाजी भुसे
‘ईडी’कडून देशमुखांच्या मालमत्तांची झाडाझडती
दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्येही कोरोना

एर्नाकुलम/वृत्तसंस्था ः अल्पावधीतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी प्रसिद्ध अभिनेत्री अमाला पॉल हिला एका वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. केरळमधील एका हिंदू मंदिरात तिला प्रवेश नाकारण्यात आला. मंदिरातील अधिकार्‍यांनी तिला रोखले, असा आरोप अमला पॉलने केला आहे. केरळमधील एर्नाकुलम येथील तिरुवैरानिकुलम महादेव मंदिरात दर्शनासाठी गेली असताना अमलाला प्रवेश करण्यापासून मंदिरामधील अधिकार्‍यांनी रोखले.

अमला पॉल ही मंदिरात दर्शनासाठी गेली होती. पण मंदिराच्या अधिकार्‍यांनी तिला प्रथेबाबत सांगितले. या मंदिराच्या आवारात फक्त हिंदूंनाच परवानगी आहे. त्यामुळे तुम्हाला दर्शन घेता येणार नाही, असे मंदिरामधील अधिकार्‍यांकडून तिला सांगण्यात आले. अमला पॉलने असा आरोप केला आहे की, मंदिर प्रशासन अधिकार्‍यांनी तिला मंदिरात प्रवेश घेऊ दिला नाही, त्यामुळे तिला मंदिरासमोरील रस्त्यावरुनच देवीचे दर्शन घ्यावे लागले. या घटनेनंतर तिरुवैरानिकुलम महादेव मंदिर ट्रस्टच्या प्रशासनावर प्रश्‍न चिन्ह उपस्थित झाले आहे. मंदिर प्रशासनाने सांगितले की, ते फक्त प्रोटोकॉलचे पालन करत आहेत. ट्रस्टचे सचिव प्रसून कुमार म्हणाले, मंदिरात इतर अनेक धर्माचे भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, जेव्हा एखादी सेलिब्रिटी येते तेव्हा चर्चा होते. अमला पॉलचा जन्म ख्रिश्‍चन कुटुंबात झाला आहे. ती दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती मूळची केरळची असून तिने इंग्रजी विषयातून पदवी संपादन केली आहे.अ मला पॉनलने मल्याळम, तेलूगू आणि तमिळ भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. मैना, इथु नमुदे कथा, मुप्पोझधुम अन कर्पनैगल आणि रन बेबी रन यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने प्रमुख भूमिका साकारली आहे. अमलाने वयाच्या 17 व्या वर्षी ‘नीलतमारा’ या मल्याळम चित्रपटातून पदार्पण केले होते.

धार्मिक भेदभाव अजूनही अस्तित्वात ः अमाला पॉल
मंदिरामध्ये प्रवेश न मिळाल्याने अमालाने तिच्या या अनुभवाबद्दल मंदिराच्या रजिस्टरमध्ये लिहिले आहे. देवीला न पाहता देखील ती माझ्या अजूबाजूला आहे, असे मला वाटले. 2023 मध्ये धार्मिक भेदभाव अजूनही अस्तित्वात आहे, हे पाहून दुःख आणि निराशा वाटली. मी देवाजवळ जाऊ शकले नाही पण दुरुनच ते अजूबाजूला असल्याचे जाणवले. मला आशा आहे की, या धार्मिक भेदभावात लवकरच बदल होईल. वेळ येईल आणि आपल्या सर्वांना समान वागणूक दिली जाईल, असा अनुभव तिने कथन केला आहे.

COMMENTS