Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने आईचं दुसरं लग्न लावलं

मुंबई प्रतिनिधी - मराठी इंडस्ट्रीचा चाॅकलेट बाॅय सिद्धार्थ चांदेकर यानी त्याच्या आईचे दुसरे लग्न लावून दिले आहे. सिद्धार्थची आई आणि अभिनेत्री

डॉ. अर्चना पाटील चाकूरकर भाजपच्या वाटेवर ?
“पतीला घटस्फोट दे नाही तर…” अशी धमकी देत करुणा मुंडेंवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल | LokNews24
कोपरगावमध्ये अद्यावत क्रीडा संकुल उभारणार

मुंबई प्रतिनिधी – मराठी इंडस्ट्रीचा चाॅकलेट बाॅय सिद्धार्थ चांदेकर यानी त्याच्या आईचे दुसरे लग्न लावून दिले आहे. सिद्धार्थची आई आणि अभिनेत्री सीमा चांदेकर यांनी दुसरं लग्न केलंय. सिद्धार्थने स्वतः पुढाकार घेऊन आईचं दुसरं लग्न लावलंय. सिद्धार्थने आईसाठी घेतलेल्या या निर्णयाचं खुप कौतुक होतंय. त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये त्यांनाही सोबती हवा या इच्छेतून सिद्धार्थने आईचं दुसरं लग्न थाटामध्ये केलं आहे.  सिद्धार्थची आई आणि अभिनेत्री सीमा चांदेकर यांनी दुसरं लग्न केलंय आणि तिच्या या निर्णयाला सिद्धार्थने पाठिंबा दिला आहे. सिद्धार्थने या संबंधित एक पोस्ट शेअर करत कॅप्शन लिहिले आहे की, “Happy Second Innings आई! तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्तापर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! I love you आई! Happy Married Life.” तर मिताली मयेकरने देखील तिच्या सासूच्या दुसऱ्या लग्नाची पोस्ट शेअर करत खाली कॅप्शन दिले आहे, “Happy married life सासूबाई! माझ्या सासूचं लग्न! किती सूना हे म्हणू शकतात की मी माझ्या सासूच्या लग्नात हजर होते? खरंच मला अभिमान वाटते तुझा की हा एव्हढा मोठ्ठा निर्णय तू अगदी न डगमगता घेतलास. मला अभिमान वाटतो तुझ्या मुलाचा की तो सुद्धा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहिला. आणि मला अभिमान वाटतो या एका अतिशय कमाल कुटुंबाचा एक भाग असण्याचा.आजवर तू आमच्या सगळ्यांसाठी सगळं अगदी मनापासून केलंस. पण आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आलीये. अशीच कायम आनंदात राहा, हसत राहा. बाकी आम्ही मुलं तुझ्यासोबत आहोतच.तुला आणि नितिन काकांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम.

COMMENTS