Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभिनेता रणदीप हुड्डाचा अपघात

मुंबई प्रतिनिधी- बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडाचा एका चित्रपटाची शूटिंग करत असता घोड्यावरून पडून त्याचा अपघात झाला असून अभिनेता रणदीप हुडा यांना उपच

महाआरतीच्या कावड मिरवणुकीत लक्षवेधी अघोरी नृत्य
सहावर्षीय मुलीचा बारावर्षीय मुलाकडून विनयभंग
साहित्याचे नोबेल : अध्यात्म आणि भूक! 

मुंबई प्रतिनिधी- बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडाचा एका चित्रपटाची शूटिंग करत असता घोड्यावरून पडून त्याचा अपघात झाला असून अभिनेता रणदीप हुडा यांना उपचारासाठी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्तानुसार, घोडेस्वारी करताना तो बेशुद्ध पडला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याला पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. याआधी गेल्या वर्षीही रणदीप हुडाला दुखापत झाली होती. तो सुपरस्टार सलमान खानसोबत त्याच्या ‘राधे’ चित्रपटासाठी अॅक्शन सीनचे शूटिंग करत होता. सीन शूट करताना रणदीपला दुखापत झाली. ही दुखापत इतकी गंभीर होती की ‘हायवे’ स्टारला उजव्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली. आता पुन्हा एकदा रणदीप जखमी झाला आहे. आता त्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

COMMENTS